कुत्रा अंगावर भुंकल्याचा छोटासा वाद, धडाधड गोळ्या झाडून बड्या अधिकाऱ्याला संपवलं, कालच सिंगापूरहून आलेला
हरियाणाच्या फरिदाबादमध्ये धडाधड गोळ्या झाडून बड्या अधिकाऱ्याला संपवल्याची घटना घडली आहे. कालच हा अधिकारी सिंगापूरहून आलेला हरियाणात आला होता.

हरियाणाच्या फरीदाबादमधून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सिंगापूरमधील एका सॉप्टवेअर कंपनीच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर परमजीत धनखड यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ओरोपी मोनू शर्माने शुक्रवारी सकाळी अनखीर पोलीस चौकीच्या समोरच जीवे मारण्याची धमकी दिली होती. या धमकीनंतर साडे नऊ तासानंतर म्हणजे रात्री साडेआठ वाजता परमजीत यांना घरातून खाली बोलावलं. त्यानंतर आरोपीने परमजीत यांची गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, सिंगापूरमधील कंपनीचे सीओओ परमजीत हे सेक्टर 21 सी येथील बिल्डिंगमध्ये पहिल्या मजल्यावर राहायला होते. तर आरोपी मोनू शर्माचा फ्लॅट हा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहायला आहे. दोघांमध्ये मागील तीन-चार महिन्यांपासून पार्किंग आणि कुत्र्यानं पार्किंगमध्ये भुंकणे, विष्ठा करण्यावरून वाद झाला होता. परमजीत यांनी मित्र गजराज यांना सांगितलं की, शुक्रवारी सकाळी मोनूने परमजीत यांचा मुलगा शौर्य याला देखील शिवीगाळ केली. नंतर परमजीत यांनी याबाबत सकाळी 11 वाजता पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी त्यानंतर आरोपी मोनूला पोलीस स्टेशनला बोलावलं. त्यावेळी देखील मोनूने परमजीत यांना जीवे मारण्याची धमकी दिली. परंतु पोलिसांनी मोनूने दिलेली धमकी गांभीर्याने घेतली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , मोनूने परमजीत यांना पार्किंगमध्ये असलेली गाडी व्यवस्थित लावण्यासाठी बोलावून घेतलं.
परमजीत खाली आल्यानंतर मोनू म्हणाला, तू कधी विधवा महिलेला पाहिलं आहे का? तुझा देवावर विश्वास आहे का, चल तुला देवाजवळ पाठवतो. त्यानंतर मोनूने परमजीतवर गोळ्या झाडण्यास सुरुवात गेली. आरोपी मोनू शर्माकडे स्वत:जवळ एक बॅग होती. पोलिसांना या बॅगमध्ये 9 गोळ्यांनी भरलेलं पिस्तुल होतं. तसेच वेगळ्या 100 गोळ्या होत्या. मोनूने परमजीतवर 14 गोळ्या झाडल्या. त्यातील 9 गोळ्या परमजीत यांच्या शरीराला लागल्या. आरोपी मोनू शर्माने परमजीतचा मुलगा शौर्यवर देखील तीन गोळ्या झाडल्या. परंतु शौर्यने कारच्या मागे लपून स्वत:चा जीव वाचवला. या घटनेनंतर आरोपी मोनू हा कुटुंबासहित फरार झाला होता. परंतु पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने शोध घेत आरोपी मोनू शर्माला अटक केल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. आता आरोपीला कोर्टात हजर केलं जाणार आहे.