दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलेंडरच्या दरात वाढ? बुकिंगपूर्वी जाणून घ्या आजचे LPG चे दर
LPG Price on 8 Nov 2026: गेल्या तीन महिन्यांपासून व्यावसायिक सिलेंडरच्या किमती सातत्याने वाढत आहेत. परंतु, घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती अनेक महिन्यांपासून स्थिर आहेत. आजचे माहाराष्ट्रतील दर नेमके काय आहेत जाणून घेऊयात.

भारतात स्वयंपाकासाठी एलपीजी सिलेंडरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. सणासुदीला तर फार वापर होतो. यावरच गृहिणींचं महिन्याचं गणित अवलंबून असतं.त्यामुळेच एलपीजीची किंमत हा एक महत्त्वाचा घटक ठरतो. याशिवाय हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स चालवणाऱ्या लोकांसाठी व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दरही महत्त्वाचे असते. अशा परिस्थितीत, किमतीत झालेला अगदी छोटासा बदलही मासिक खर्चावर मोठा परिणाम करू शकतो. त्यामुळे दिवाळीच्या पहिल्या दिवशी नेमका गॅस सिलेंडरचे दर काय आहेत हे जाणून घ्या.
महाराष्ट्रातील एलपीजी गॅस सिलिंडरचे दर
घरगुती गॅस सिलिंडर (१४.२ किलो)
अहमदनगर – ₹955.50, अकोला – ₹962.00, अमरावती – ₹975.50, औरंगाबाद – ₹950.50, भंडारा – ₹1,002.00, बीड – ₹967.50, बुलढाणा – ₹956.50, चंद्रपूर – ₹990.50, धुळे – ₹962.00, गडचिरोली – ₹1,011.50, गोंदिया – ₹1,010.50, ग्रेटर मुंबई – ₹941.50, हिंगोली – ₹967.50, जळगाव – ₹947.50, जालना – ₹950.50, कोल्हापूर – ₹944.50, लातूर – ₹966.50, मुंबई – ₹941.50, नागपूर – ₹993.50, नांदेड – ₹967.50, नंदुरबार – ₹954.50, नाशिक – ₹945.50, धाराशिव (उस्मानाबाद) – ₹966.50, पालघर – ₹953.50, परभणी – ₹968.00, पुणे – ₹945.00, रायगड – ₹952.50, रत्नागिरी – ₹956.50, सांगली – ₹944.50, सातारा – ₹946.50, सिंधुदुर्ग – ₹956.00, सोलापूर – ₹949.50, ठाणे – ₹941.50, वर्धा – ₹1,002.00, वाशिम – ₹962.00, यवतमाळ – ₹983.50.
व्यावसायिक गॅस सिलिंडर (१९ किलो)
अहमदनगर – ₹2,866.00 (+₹11.00), अकोला – ₹2,905.00 (+₹10.50), अमरावती – ₹2,935.50 (+₹11.00), औरंगाबाद – ₹2,880.00 (+₹10.50), भंडारा – ₹3,012.00 (+₹11.00), बीड – ₹2,911.50 (+₹10.50), बुलढाणा – ₹2,884.50 (+₹10.50), चंद्रपूर – ₹2,986.00 (+₹10.50), धुळे – ₹2,892.00 (+₹11.00), गडचिरोली – ₹3,026.50 (+₹11.00), गोंदिया – ₹3,026.50 (+₹11.00), ग्रेटर मुंबई – ₹2,775.00 (+₹10.50), हिंगोली – ₹2,907.50 (+₹10.50), जळगाव – ₹2,864.50 (+₹10.50), जालना – ₹2,887.00 (+₹11.00), कोल्हापूर – ₹2,799.00 (+₹11.00), लातूर – ₹2,902.50 (+₹11.00), मुंबई – ₹2,775.00 (+₹10.50), नागपूर – ₹2,999.00 (+₹10.50), नांदेड – ₹2,907.50 (+₹10.50), नंदुरबार – ₹2,803.50 (+₹10.50), नाशिक – ₹2,851.00 (+₹10.50), धाराशिव (उस्मानाबाद) – ₹2,908.50 (+₹10.50), पालघर – ₹2,805.50 (+₹10.50), परभणी – ₹2,913.00 (+₹10.50), पुणे – ₹2,835.50 (+₹10.50), रायगड – ₹2,802.50 (+₹11.00), रत्नागिरी – ₹2,858.00 (बदल नाही), सांगली – ₹2,799.00 (+₹11.00), सातारा – ₹2,842.50 (+₹11.00), सिंधुदुर्ग – ₹2,827.50 (+₹11.00), सोलापूर – ₹2,875.00 (+₹11.00), ठाणे – ₹2,775.00 (+₹9.00), वर्धा – ₹3,016.50 (+₹11.00), वाशिम – ₹2,898.00 (+₹10.50), यवतमाळ – ₹2,950.00 (+₹10.50).
