AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Israel Govt Formation : 19 वर्षानंतर इस्रायलच्या राजकारणात गेम पलटला, मोदींचे मित्र नेतन्याहू यांना इस्रायली राष्ट्रपतींनी दिला पहिला धक्का

Israel Govt Formation : इस्रायलमध्ये सत्तेवर कोण येणार? याकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलं आहे. इस्रायलमध्ये सार्वत्रिक निवडणुका मागच्या महिन्यात झाल्या. पण कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही.

Israel Govt Formation : 19 वर्षानंतर इस्रायलच्या राजकारणात गेम पलटला, मोदींचे मित्र नेतन्याहू यांना इस्रायली राष्ट्रपतींनी दिला पहिला धक्का
gadi Eisenkot vs benjamin netanyahu
| Updated on: Nov 08, 2026 | 8:35 AM
Share

इस्रायलच्या राजकारणात एक मोठा उलटफेर होण्याची चिन्ह दिसत आहेत. इस्रायलचे राष्ट्रपती इसाक हर्जोग यांनी गादी आयसेनकोट यांना पहिल्यांदा सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलं आहे. इस्रायलचे विद्यमान पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. इस्रायलच्या राजकारणात 19 वर्षानंतर बदल पहायला मिळणार आहे. गादी आयसेनकोट हे इस्रायलचे माजी सैन्य प्रमुख आहेत. नेतन्याहू यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली होती. इस्रायलचे दीर्घकाळ पंतप्रधान राहिलेल्या नेतन्याहू यांना सत्तेवरुन हटवण्यासाठी आयसेनकोट यांनी एक पाऊल पुढे टाकलं आहे. 27 ऑक्टोंबर रोजी इस्रायलमध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या. 120 सदस्यांच्या इस्रायली संसदेत बहुमताचा आकडा 61 आहे.

आयसेनकोट ज्या आघाडीचं नेतृत्व करतात, त्यांना 48 जागा मिळाल्या आहेत. नेतन्याहू यांच्या आघाडीकडे त्यापेक्षा जास्त जागा आहेत. पण बहुमत गाठण्यासाठी जी सदस्य संख्या हवी आहे, ती आयसेनकोट यांच्याकडे आहे. अरब पक्षांनी आयसेनकोट यांचं समर्थन केलं आहे. त्यामुळे इस्रायलच्या राष्ट्रपतींनी आयसेनकोट यांना सरकार बनवण्याचं निमंत्रण दिलं आहे. शपथ ग्रहणाच्या तारखेची घोषणा करण्यात आलेली नाही. आयसेनकोट यांच्याकडे 67 सदस्यांचं संख्याबळ आहे. “नेसेटसाठी निवडलेल्या सर्व पक्षांशी सल्ला मसलत केल्यानंतर मी जनतेला सांगू इच्छितो की, मी सर्व गटांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. चर्चा खुल्या, स्पष्ट आणि व्यवहारिक होत्या” अशी माहिती राष्ट्रपती हरजोग यांनी दिली.

अरब पक्ष या निवडणुकीत किंगमेकरच्या भूमिकेत

इस्रायलच्या प्रमुख पक्षांच्या प्रतिनिधींनी चर्चेमध्ये राष्ट्रपतींना आयसेनकोट यांच्याकडे सरकार बनवण्याची जबाबदारी सोपवण्याचा सल्ला दिला. पण बहुमताचा आकडा अजून कोणाकडे नाहीय. आयसेनकोट यांना ते नेसेट मध्ये सिद्ध करावं लागणार आहे. मागच्या महिन्यात झालेल्या निवडणुकीत नेतन्याहू आणि त्यांच्या आघाडीने बहुमत गमावलं. अरब पक्ष या निवडणुकीत किंगमेकरच्या भूमिकेत आहेत. त्यांचं पाठबळ ज्यांच्याकडे ती आघाडी सत्तेत येऊ शकते. नेतन्याहू हे कट्टर मुस्लिम विरोधी आहेत. त्यामुळे अरब पक्ष त्यांचं कधीही समर्थन करणार नाहीत.

इस्रायलमध्ये पहिल्यांदा असा बदल घडतोय

आधी असं म्हटलं जात होतं की, नेतन्याहू आणि आयसेनकोट आपसात हातमिळवणी करुन सत्ता स्थापन करतील. यात व्हाइट हाऊसची भूमिका महत्वाची असेल. कारण इस्रायलमध्ये यहूदी सरकारची परंपरा आहे. अरब पक्षांना सोबत घेणं तिथल्या राजकीय मानसिकतेत नाहीय. पण इस्रायलमध्ये पहिल्यांदा असा बदल घडतोय. इस्रायल एक छोटासा देश असला तरी, तिथे घडणाऱ्या घडामोडींचे जागतिक राजकारणात पडसाद उमटतात.

Follow Us
पेट्रोलमध्ये 20% नव्हे, तर तब्बल 31% इथेनॉल! कर्नाटक सरकारचा आरोप...
मोठी बातमी! पेट्रोलमध्ये 20% नव्हे, तर तब्बल 31% इथेनॉल; कर्नाटक सरकारच्या आरोपाने खळबळ
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत..
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत करण्यास सांगितलं!
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर...
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर राष्ट्रवादी नेतेही पोहोचले!
अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
Ayodhya Dipotsav : अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्ला
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्लाबोल
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या...
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या जुन्या कारभारावर बोट
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा!
पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
Payal Pawar Zhambre : पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट,
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट, चिमुकल्यांची चटणी-भाकरीवर दिवाळी!
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज;
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज; एकनाथ शिंदेंकडे मांडली कैफियत