लालू प्रसाद यादव यांचा ऑपरेशननंतर पहिला व्हीडिओ त्यांच्या मुलीकडून शेअर, म्हणाली…

सिंगापूरमध्ये लालू प्रसाद यादव यांच्यावर झालेली शस्रक्रिया यशस्वी झाली आहे. त्यांच्या या शस्रक्रियेनंतर त्यांना आयसीयूमध्ये भरती करण्यात आले आहे.

लालू प्रसाद यादव यांचा ऑपरेशननंतर पहिला व्हीडिओ त्यांच्या मुलीकडून शेअर, म्हणाली...
Image Credit source: tv 9 Marathi
| Updated on: Dec 05, 2022 | 4:49 PM

नवी दिल्लीः राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव गेल्या काही दिवसांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर आता सिंगापूरमधील किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रियी यशस्वी झाली आहे. लालू प्रसाद यादव यांच्या या किडनी ट्रान्सप्लांटची माहिती देताना डॉ. मिसा भारती यांनी सांगितले आहे की, आपल्या वडिलांची शस्रक्रिया ही यशस्वी झाली आहे.

त्यांना आता आयसीयूमध्ये असून ते शुद्धीत आले असून ते आता बोलत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्यांनी आपल्या वडिलांसाठी सदिच्छा देणाऱ्यांचे फेसबुकवर आभारही मानले आहेत.

तर त्यांच्या या आजाराची माहिती देताना लालू प्रसाद यादव यांचा छोटो मुलगा आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनीही ट्विट करून ही माहिती दिली आहे.

या शस्त्रक्रियेची माहिती देताना त्यांनी सांगितले आहे की, सिंगापूरमध्ये लालू प्रसाद यादव यांच्यावर झालेली शस्रक्रिया यशस्वी झाली आहे. त्यांच्या या शस्रक्रियेनंतर त्यांना आयसीयूमध्ये भरती करण्यात आले आहे.

 

लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी यांनी आपल्या वडिलांना किडनी दान केली आहे. सोमवारी सकाळी सिंगापूरमध्ये लालू प्रसाद यादव यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. किडनी ट्रान्सप्लांट करण्यात आल्यानंतर रोहिणी यांचीही तब्बेत चांगली असल्याची माहिती तेजस्वी यादव यांनी दिली आहे.

सिंगापूरमध्ये त्यांच्यासोबत आता त्यांची पत्नी राबडीदेवी आणि त्यांचा सगळा परिवार त्यांच्यासोबत आहे.

लालू प्रसाद यादव यांच्यावर आज शस्रक्रिया होणार म्हणून आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आज बिहारमध्ये पूजा, होमहवन करण्यात आले आहेत.

राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी पटनामध्ये शीतला माता मंदिरामध्ये हवन पूजन आणि महामृत्यूंजयचा जप करून त्यांना दीर्घायुष्य मिळावे म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यात आली आहे.