भारतात गर्दी नियंत्रणासाठी पॅलेट गनला परवानगी आहे का ? पॅलेट गन नेमकी कशी असते?
नीट पेपर लीक संदर्भात दिल्लीत झालेल्या आंदोलनादरम्यान RAF ने पॅलेट गनचा वापर केल्याचा आरोप होत आहे. आता या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. पॅलेट गन संदर्भात नेमका वाद काय आहे ?

दिल्लीत जंतरमंतरवर निदर्शने सुरु असताना आंदोलकांवर पॅलेटगनचा वापर केल्याचा आरोप विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी केला आहे. या संदर्भात आता आरपीएफ (RAF)चौकशी करणार आहे. रॅपिड एक्शन फोर्सने दिल्लीत २० जुलै रोजी कॉक्रोच जनता पार्टी निदर्शकांवर बळाचा वापर केल्याच्या आरोपांची चौकशी सुरु केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात औपचारिकदृष्ट्या ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’वर विचार केला जाईल. अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले की रॅपिड एक्शन फोर्सने या प्रकरणात चौकशी सुरु केली आहे. पॅलेट गनचा वापर केला नाही ! कॉक्रोच जनता पार्टीने नीट पेपर फुटी प्रकरणात गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या जंतरमंतर येथे आंदोलन सुरु केले होते. या आंदोलनात आधी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आमरण उपोषण सुरु केले होत. सोनम वांगचुक यांची तब्येत ढासळत गेल्याने त्यांच्या उपोषणाच्या २१ व्या दिवशी पोलिसांनी त्यांना घटना स्थळावरुन उचलून जबरदस्ती दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. ...