या गावातील गावकऱ्यांना फुटला घाम… मरणाच्या भीतीने उडाली गाळण… 200 लोक प्यायले रेबीज संक्रमित गायीच्या दुधाचं पंचामृत, आता…

ती गाय रेबीज संक्रमित होती असं कळताच या गावातील गावकऱ्यांना फुटला दरदरून घाम, 200 लोकांना मरणाची भीती; काय घडलं?

या गावातील गावकऱ्यांना फुटला घाम... मरणाच्या भीतीने उडाली गाळण... 200 लोक प्यायले रेबीज संक्रमित गायीच्या दुधाचं पंचामृत, आता...
cow
| Updated on: Nov 19, 2025 | 8:23 PM

पाळीव प्राण्यांना देखील योग्य उपचारांची गरज असते. गावात अनेक जण गायी पाळतात. पण गाय जर रोबीज संक्रमीत असेल तर, माणसांच्या जीवाला धोका निर्माण होतो. असंच काही एका गावात झाल्यामुळे 200 जणांना मरणाची भीती सतावत आहे. गोरखपूरच्या रामडीह गावात रेबीजची लागण झालेल्या गायीचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात भीतीचं वातावण पसरलं आहे. सांगायचं झालं तर, काही दिवसांपूर्वा गावात धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमात रेबीजची लागण झालेल्या गायीच्या दुधापासून पंचामृत बनवण्यात आलं होतं. ते पंचामृत 200 लोकांनी ग्रहण केलं… आता गायीचं मृत्यू झाल्यानंतर डॉक्टरांनी गावकऱ्यांना इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिला आहे. ज्यानंतर 170 लोकांचं लसीकरण करण्यात आलं आहे.

200 गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण…

संबंधीत घटना गोरखपूर येथील उरुवा ब्लॉक याठिकाणी घडली आहे. ज्यामुळे जवळपास 200 गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. गावात झालेल्या एका धार्मिक समारंभात लोकांनी रेबीज बाधित गायीच्या कच्च्या दुधापासून बनवलेलं पंचामृत ग्रहण केलं आणि दोन दिवसांपूर्वी त्या गायीचं निधन झालं. धक्कादायक गोष्ट म्हणजे तीन महिन्यांपूर्वी गायीला एका भटक्या कुत्र्याने चावलं होतं. म्हणून डॉक्टरांनी सर्व लोकांना रेबीज विरोधी लस घेण्याचा सल्ला दिला.

मिळालेल्या माहितीनुसार, सुशील गौर यांच्या गायीला सुमारे तीन महिन्यांपूर्वी एका भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता. गौर यांनी सतर्क राहून ताबडतोब गायीला रेबीजविरोधी लस दिली, परंतु नंतर माहितीच्या अभावामुळे त्यांनी उपचार दिले नाहीत. पण गायीला रेबीजची लक्षणं दिसू लागली आणि ती विचित्र वागू लागली. दोन दिवसांपूर्वी, गायीचा रेबीजच्या संसर्गामुळे मृत्यू झाला, ज्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं.

रामडीह गावात, राजीव गौर आणि सोनू विश्वकर्मा यांनी त्यांच्या घरी एक धार्मिक समारंभ आयोजित केला. धर्मेंद्र गौर यांच्या गायीचं कच्चं दूध पंचामृत तयार करण्यासाठी वापरलं गेलं. प्रसाद असल्यामुळे 150 – 200 गावकऱ्यांनी दूध ग्रहण केलं. गायीला रेबीज झाल्याची बातमी कळताच संपूर्ण गावात धोक्याची घंटा वाजली. पंचामृत सेवन करणाऱ्यांमध्ये कुटुंब आणि नातेवाईकही होते.

170 पेक्षा अधिक लोकांचं लसीकरण…

या घटनेनंतर, उरुवा प्राथमिक आरोग्य केंद्रात ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली. डॉक्टर डॉ. एपी सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, खबरदारी म्हणून, पंचामृत सेवन करणाऱ्या कोणालाही रेबीज लसीचे तीन डोस दिले जातील. आतापर्यंत, 170 हून अधिक गावकऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पोहोचून लसीचा पहिला डोस घेतला आहे. संसर्गाचा धोका थेट जीवनाशी संबंधित असल्याने लोक अत्यंत चिंतेत आहेत.