12 दिवसात खिसा किती कापला? डिझेल आणि पेट्रोलच्या भावात किती वाढ? पटापट चेक करा..

इराण आणि अमेरिका युद्धाचा थेट फटका भारतात बघायला मिळत आहे. त्यामध्येच काल पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाली आणि आज सीएनजीच्या गेल्या 12 दिवसांपासून पेट्रोल, डिझेलसह सीएनजीच्या किमतीत वाढ होत आहे.

12 दिवसात खिसा किती कापला? डिझेल आणि पेट्रोलच्या भावात किती वाढ? पटापट चेक करा..
Petrol and Diesel
| Updated on: May 26, 2026 | 9:58 AM

इराण आणि अमेरिका युद्धात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ होत आहे. कालच पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये 10 दिवसात चाैथ्यांना वाढ झाली. आजही मोठा दणका देत सीएनजीच्याही भावात मोठी वाढ झाली. प्रति किलो 2 रूपयांनी वाढ झाली. महागाईचे बॉम्ब सर्वसामान्य लोकांवर कोसळताना दिसत आहेत. गेल्या 12 दिवसांपासून लोकांच्या खिशातून अधिकचे पैसे जात आहेत. चार वेळेला पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाली. इराण आणि अमेरिका यांच्यात स्थिती अशीच राहिली तर अजूनही मोठी वाढ पेट्रोल डिझेलच्या किमतीत होऊ शकते. शिवाय मोठा तुटवडाही जाणवेल.सीएनजीच्याही भावात चाैथ्यांना वाढ झाली. होर्मुज खाडी बंद असल्याने आता सर्वसामान्यांवर परिणाम दिसत आहेत. जगातिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ होत आहे.

आपण गेल्या 12 दिवसांचा विचार केला तर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये तब्बल 7 रूपयांनी प्रति लीटर वाढ झाली. सीएनजीची चार वेळा दरवाढ झाली. त्यानुसार, 12 दिवसांमध्ये सीएनजीमध्ये 6 रूपयांनी वाढ झाली. 15 मे 2026 रोजी अचानक तेल कंपन्यांनी मोठा निर्णय घेत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ केली. तब्बल 3 रूपयांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढ केली.

त्यानंतर सीएनजीच्याही किमतीत 2 रूपयांनी वाढ करण्यात आली. 17 मे 2026 रोजी सीएनजी पुन्हा 1 रूपयांनी महाग झाले. 23 मे 2026 रोजी पुन्हा 1 रूपयांनी सीएनजी वाढले. आता आज 26 मे 2026 रोजी चाैथ्यांना 2 रूपयांनी सीएनजीच्या किमतीत वाढ झाली. देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या कंपन्यांनी 15 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ केली. भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये होणारी वाढ हा मोठा मुद्दा बनला आहे.

सतत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे. ज्यामुळे याचा थेट सर्वसामान्य लोकांवर परिणाम होत आहे. आर्थिक गणित बिघडत आहे. त्यामध्येच पेट्रोल आणि डिझेल मिळत देखील नाहीत. जागतिक बाजारपेठ इराण आणि अमेरिका यांच्या युद्धामुळे अस्थिर झाली.ज्याचा परिणाम सर्वच देशांमध्ये बघायला मिळतोय. काही देशांमध्येही स्थिती अधिक गंभीर असून थेट लॉकडाऊन लावण्याची वेळ आली.

Follow Us