हे झाड घरापासून थोडं दूरच लावा, रात्री असतो सापांचा डेरा, घराच्या आसपास सतत साप दिसतील

उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. उन्हाळाच्या दिवसांमध्ये साप बिळातून बाहेर येण्याचं प्रमाण वाढतं, त्यामुळे अनेकदा सर्पदंशाच्या घटना देखील घडतात. त्यामुळे सतर्कता हाच यावरील सर्वात प्रभावी उपाय आहे. परंतु निसर्गात असे देखील काही झाडं आहे, ज्या झाडांच्या विशिष्ट गुणधर्मांमुळे साप या झाडांकडे आकर्षीत होतात.

हे झाड घरापासून थोडं दूरच लावा, रात्री असतो सापांचा डेरा, घराच्या आसपास सतत साप दिसतील
snake
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 09, 2026 | 7:43 PM

पावसाळा आणि उन्हाळा या दोन ऋतुंमध्ये तुम्हाला अनेकदा तुमच्या घराच्या परिसरामध्ये साप दिसतात. परंतु हिवाळ्यात सहसा सापांचं दर्शन होत नाही. यामागे नेमकं काय कारण असू शकतं, याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? उन्हाळ्यामध्ये जमीन तापल्यामुळे सापाला उष्णता असाह्य होते. त्यामुळे साप आपल्या बिळातून बाहेर पडतात आणि थंड जागेचा शोध घेतात. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये साप लपण्यासाठी नेहमी अंधाऱ्या आणि थंड जागेचा शोध घेत असतात. त्यामुळे तुमच्या घरातही अशा जागा असतील तर तिथे वावरताना काळजी घ्यावी. तर पावसाळ्यात सापांच्या बिळात पाणी घुसल्याने ते बिळातून बाहेर पडतात आणि कोरड्या परंतु अंधाऱ्या जागेचा शोध घेतात. त्यामुळे पावसाळ्यात आपल्या घरात साप शिरण्याचं प्रमाण वाढतं. जर समजा तुमच्या घरात कधी साप निघालाच तर घाबरून जाऊ नका, त्याला पकडण्याचा तर चुकूनही प्रयत्न करू नका, कारण ते तुमच्या जीवावर देखील बेतू शकतं. तर सर्वात सुरक्षीत मार्ग म्हणजे तुम्ही याची माहिती सर्पमित्रांना द्या, ते सापांना पकडून त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडतील.

आपल्याकडे सापांबद्दल अनेक गैरसमज आहेत, जसं की प्रत्येक साप हा विषारीच असतो, अशा प्रकारच्या अनेक गैरसमजामुळे आपण सापांना थेट मारू टाकतो. परंतु असं करू नका, कारण साप हे शेतकऱ्यांचे मित्र आहेत. ज्या परिसरामध्ये सापांची संख्या जास्त असते, त्या परिसरात उंदरांची संख्या ही नियंत्रणात राहते. त्यामुळे मोठं नुकसान टळतं. भारतामध्ये सापांच्या हजारो प्रजाती आहेत, मात्र त्यातील केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच सापाच्या जाती या विषारी आहेत. ज्यामध्ये घोणस, फुरसे, मण्यार आणि नाग यांचा समावेश होतो. त्यामुळे साप घरात जरी निघाला तरी घाबरून जाऊ नका, त्यावर लक्ष ठेवा आणि त्याची माहिती सर्पमित्रांना द्या.

दरम्यान निसर्गात अशी देखील काही झाडं असतात, त्यांच्या विशिष्ट गुणधर्मांमुळे साप या झाडांकडे आकर्षित होतात. त्यामुळे अशी झाडं घराच्या आसपास लावताना काळजी घेणं गरजेचं असतं. आज आपण अशाच एका झाडाबद्दल माहिती घेणार आहोत. ते झाड आहे रातराणीचं झाड. रातराणीच्या झाडाला रात्री सुंदर फुले येतात. हे झाड आपल्या सुंदर आणि सुवासिक फुलांसाठी प्रसिद्ध आहे. परंतु या झाडाच्या विशिष्ट गुणधर्मामुळे रात्रीच्या वेळी अनेकदा या झाडाखाली साप देखील आढळून येतात. त्यामुळे अशी झाडं घरात लावताना योग्य ती काळजी घेतली गेली पाहिजे. ही झाडं घरापासून थोडी दूर अंतरावर लावावीत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us