PM Modi addresses in AMU : AMUमध्ये मिनी इंडिया दिसून येतो, ही विविधता देशाची ताकद: मोदी

| Updated on: Dec 22, 2020 | 5:02 PM

नवी दिल्ली: अलीगड मुस्लिम विद्यापीठाला आज 100 वर्षे पूर्ण झाले आहेत. विद्यापीठाच्या या शताब्दी समारंभ प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संबोधित करत आहेत. LIVE NEWS & UPDATES The liveblog has ended. 22 Dec 2020 05:02 PM (IST) एएमयूच्या विकासाला पुढे नेण्यासाठी सरकार कुठेही कमी पडणार नाही, मोदींचं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भरतेचा मंत्र देतानाच […]

PM Modi addresses in AMU : AMUमध्ये मिनी इंडिया दिसून येतो, ही विविधता देशाची ताकद: मोदी
Follow us on

नवी दिल्ली: अलीगड मुस्लिम विद्यापीठाला आज 100 वर्षे पूर्ण झाले आहेत. विद्यापीठाच्या या शताब्दी समारंभ प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संबोधित करत आहेत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 22 Dec 2020 05:02 PM (IST)

    एएमयूच्या विकासाला पुढे नेण्यासाठी सरकार कुठेही कमी पडणार नाही, मोदींचं आश्वासन

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भरतेचा मंत्र देतानाच एएमयूच्या विकासाला पुढे नेण्यासाठी सरकार कुठेही कमी पडणार नाही याचं आश्वासन दिलं, राजकारणाच्या पलिकडे जाऊन एएमयूच्या विद्यार्थ्यांनी पुढे यावे, ही युवाशक्तीचं देशाच्या विकासात मोठं योगदान देऊ शकते

  • 22 Dec 2020 11:45 AM (IST)

    शंभर वर्षात एएमयूला पुढे नेण्यास ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यांना अभिवादन करतो : मोदी

    या शंभर वर्षात एएमयूला पुढे नेण्यास ज्यांनी ज्यांनी कंबर कसली त्यांना अभिवादन करतो, जगभरात पोहोचलेल्या एएमयूच्या विद्यार्थ्यांच्या उत्तम आरोग्याची प्रार्थना करतो आणि एएमयूच्या भावी वाटचालीला शुभेच्छा देतो. धन्यवाद


  • 22 Dec 2020 11:44 AM (IST)

    पुढील 27 वर्षात आधुनिक भारत निर्माण करायचाय : मोदी

    पुढच्या 27 वर्षात आधुनिक भारत निर्माण करायचा आहे. तुम्ही देशाचाच विचार करा. देशाला आत्मनिर्भर कसं करता येईल, याचा विचार करा. आपण सर्वांनी देशाला पुढे नेण्यासाठी कंबर कसली पाहिजे. चला पुढे या

  • 22 Dec 2020 11:43 AM (IST)

    नव भारताच्या निर्मितीत मतभेदांमुळे अडथळा येता कामा नये : मोदी

    यापूर्वीच आपण मतभेदांद्वारे अनेक गोष्टी गमावल्या आहेत. मतभेदामुळे आपला बराच वेळ वाया गेला आहे. पण आता नव भारताच्या निर्मितीत या गोष्टींचा अडथळा येता कामा नये

  • 22 Dec 2020 11:42 AM (IST)

    नव्या भारताचं निर्माण करताना राजकारणाकडे दुर्लक्ष केलं पाहिजे : मोदी

    राष्ट्र आणि समाजाच्या विकासाला राजकीय चष्म्यातून पाहू नये, काही लोक आपला स्वार्थ ठेवून राजकारण करण्याचा प्रयत्न करतात. आपण नव्या भारताचं निर्माण करताना त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, नव्या भारताच्या निर्मितीवेळी खुज्या आणि संकुचित विचाराची लोकं आपोआपच मागे पडतात. त्यामुळे आपण विशाल दृष्टीकोण ठेवून काम केलं पाहिजे

  • 22 Dec 2020 11:41 AM (IST)

    राजकारण हा समाजाचा एक भाग, त्यापेक्षा समाज महत्त्वाचा : मोदी

    राजकारण हा समाजाचा एक भाग आहे, पण त्याहीपेक्षा समाज महत्त्वाचा आहे. राजकारणापलिकडे समाजाला पुढे नेण्यासाठी मोठी स्पेस असते, ही स्पेस भरुन काढली पाहिजे, एएमयूमधील लोक या गोष्टी करु शकतात, त्या केल्या पाहिजे

  • 22 Dec 2020 11:40 AM (IST)

    ‘सबका साथ, सबका विकास’ हा मंत्र घेऊनच आपल्याला पुढे जायचे आहे : मोदी

    देशातील प्रत्येक व्यक्तीची सेवा करा, मग तो कोणत्याही धर्माचा असो. ‘सबका साथ, सबका विकास’ हा मंत्र घेऊनच आपल्याला पुढे जायचे आहे

  • 22 Dec 2020 11:37 AM (IST)

    जेव्हा देशाला पुढे नेण्याचा विचार येतो तेव्हा मतभेद दूर ठेवले पाहिजे : मोदी

    देशात वैचारिक मतभेद असतातच पण जेव्हा देशाला पुढे नेण्याचा विचार येतो तेव्हा असे मतभेद दूर ठेवले पाहिजे, राष्ट्रवाद, देशाची सुरक्षा आदी गोष्टी देशासाठी सर्वोच्च असल्या पाहिजे

  • 22 Dec 2020 11:36 AM (IST)

    सबका साथ सबका विकासच्या माध्यमातूनच देशाचा विकास होऊ शकतो : मोदी

    सबका साथ सबका विकासच्या माध्यमातूनच देशाचा विकास होऊ शकतो, स्वच्छ भारत अभियानात मुस्लिम मुलींनी मोठं योगदान दिलं आहे

  • 22 Dec 2020 11:36 AM (IST)

    AMU चे विद्यार्थी जगभर देशाचं नाव मोठं करत आहेत : मोदी

    एएमयूला मोठा इतिहास आहे, यातील विद्यार्थी जगभर देशाचं नाव मोठं करत आहेत, एएमयूमधून अनेक मोठे विद्वान निर्माण झाले आहेत, त्यांनी हा देश घडवण्यात मोठं योगदान दिलं आहे

  • 22 Dec 2020 11:35 AM (IST)

    AMUमध्ये मिनी इंडिया दिसून येतो, ही विविधता देशाची ताकद : मोदी

    अलीगड मुस्लिम विद्यापीठाला आज 100 वर्षे पूर्ण झाले आहेत. विद्यापीठाच्या या शताब्दी समारंभ प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संबोधित करत आहेत. यावेळी त्यांनी अलीगड मुस्लिम विद्यापाठीच्या शैक्षणिक कार्याची मुक्तकंठाने स्तुती केली.