Nasal नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लसीबद्दल पंतप्रधान मोदींनी दिली महत्त्वाची माहिती

| Updated on: Dec 25, 2021 | 10:41 PM

कोरोनाविरोधात भारताची लढाई वैज्ञानिक सिद्धातांवर आधारीत होती असे मोदी म्हणाले. मागच्या 11 महिन्यात देशात लसीकरण सुरु आहे. देशवासियांना याचा लाभ मिळतोय.

Nasal नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लसीबद्दल पंतप्रधान मोदींनी दिली महत्त्वाची माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बैठकीकडे देशाचं लक्ष
Follow us on

नवी दिल्ली: देशात ओमायक्रॉनची (omicron) लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi)  यांनी आज देशवासियांना संबोधित केले. देशात आतापर्यंत झालेल्या लसीकरण कार्यक्रमाची माहिती देतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लवकरच नेजल आणि डीएनए व्हॅक्सीन उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. नेजल व्हॅक्सीन म्हणजे नाकावाटे लस घेता येईल.

नेजल व्हॅक्सीनचे संशोधन कुठपर्यंत पोहोचलय
कोव्हॅक्सीन लशीची निर्मिती करणारी भारत बायोटेक नाकावाटे दिल्या जाणाऱ्या नेजल व्हॅक्सीनची निर्मिती करत आहे. अलीकडेच त्यांनी डीसीजीआयकडे फेज तीनच्या स्टडीसाठी परवानगी मागितली आहे. बुस्टर डोस म्हणून नेजल व्हॅक्सीन देण्याची त्यांची योजना आहे.

नेजल व्हॅक्सीनच्या फेज दोनच्या क्लीनिकल ट्रायलसाठी ऑगस्ट महिन्यात भारत बायोटेकला परवानगी देण्यात आली होती. जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये नेजल व्हॅक्सीनच्या चाचण्या सुरु आहेत. ही व्हॅक्सीन गेमचेंजर ठरु शकते.

बेडसबद्दल दिली माहिती
कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यास बेड्स आणि ऑक्सिजनची काय स्थिती आहे, या बद्दल पंतप्रधान मोदींनी माहिती दिली. देशात आता १८ लाख आयसोलेशन बेड्स आहेत. ५ लाख ऑक्सिजन सपोर्टेड बेड्स आहेत. १ लाख ४० हजार आयसीयू बेड्स असल्याची माहिती मोदींनी दिली. देशात ३ हजारपेक्षा जास्त पीएसए ऑक्सिजन प्लांट आहेत ४ लाख ऑक्सिजन सिलिंडर देशभरात दिले गेले आहेत, असे मोदींनी सांगितले.

….तेव्हा मनाला शांती मिळते
जगातील सर्वात मोठी विस्तारीत, कठीण भौगलिक स्थिती असताना सुरक्षित लसीकरण पूर्ण केले आहे. काही राज्य, पर्यटनच्या दृष्टीने महत्त्वाची राज्य गोवा, हिमाचल प्रदेशमध्ये शत-प्रतिशत कोरोना प्रतिबंधक लसीचा सिंगल डोस देण्यात आलाय. शत-प्रतिशत लसीकरणाच्या बातम्या येतात, तेव्हा मनाला शांती मिळते, असे मोदींनी सांगितले.

संबंधित बातम्या:
Video: आधी मोदी आणि आता अमित शाह, सुजय विखे पुन्हा पुन्हा फ्रेममध्ये का येतात? का हटवले जातात?
Pro Kabaddi League PKL 2021-22: कोल्हापूरच्या सिद्धार्थची अपयशी झुंज, पुण्याचा पहिला विजय
Pro Kabaddi League PKL 2021-22: फक्त एका पॉईंटने प्रदीप नरवालच्या यूपी योद्धाची पटनावर मात