Pro Kabaddi League PKL 2021-22: फक्त एका पॉईंटने प्रदीप नरवालच्या यूपी योद्धाची पटनावर मात

Pro Kabaddi League PKL 2021-22: प्रदीप नरवालने नऊ यशस्वी रेड करत 12 पॉईंटस मिळवले. पण पटना पायरेटसने आठ वेळा प्रदीप नरवालला टॅकल केले. म्हणजे पकड केली.

Pro Kabaddi League PKL 2021-22: फक्त एका पॉईंटने प्रदीप नरवालच्या यूपी योद्धाची पटनावर मात
Follow us
| Updated on: Dec 25, 2021 | 8:42 PM

बेंगळुरु: शेवटच्या क्षणापर्यंत रोमांचक ठरलेल्या सामन्यात प्रदीप नरवालच्या (Pradeep narwal) यूपी योद्धाने पटना पायरेटसवर (Patna pirates) अवघ्या एका गुणाच्या फरकाने विजय मिळवला. 36-35 असा यूपीने हा सामना जिंकला. यूपी योद्धाच्या रेडरची पटना पायरेटसने पकड केली पण बोनस पॉईंट घेऊन त्यांनी विजय मिळवला. प्रदीप नरवालने नऊ यशस्वी रेड करत 12 पॉईंटस मिळवले. पण पटना पायरेटसने आठ वेळा प्रदीप नरवालला टॅकल केले. म्हणजे पकड केली.

पटनाच्या मोनू गोयतकडून भरपूर अपेक्षा होत्या. पण त्याने फक्त पाच पॉईंटस मिळवले. आजच्या सामन्यात रेड इतक्याच पकडी महत्त्वाच्या ठरल्या. पटनाने रेडमध्ये 17 आणि टॅकलमध्ये 17 गुण मिळवले तर यूपी योद्धाने रेडमध्ये 20 आणि टॅकलमध्ये 13 पॉईंटस मिळवले. दुसऱ्या हाफमध्ये यूपीने टॅकलमध्ये सुधारणा केली.

पहिल्या हाफमध्ये यूपी पेक्षा पटनाचा सरस खेळ पटना पायरेटस विरुद्ध यूपी योद्ध सामन्यात पहिल्या हाफमध्ये पटनाने सरस खेळ केला. ते यूपीच्या तुलनेत तीन गुणांनी पुढे होते. पटना पायरेटसकडे 20-17 अशी आघाडी होती. पटना पायरेटसने टॅकलमध्ये जबरदस्त खेळ केला. पकडीमध्ये त्यांनी तब्बल 10 पॉईंट मिळवले, तेच यूपी योद्ध टॅकलमध्ये फक्त चार पॉईंटस मिळाले. स्टार रेडर प्रदीप नरवालने सुरुवातील चमकदार खेळ केला. पण त्यानंतर पटनाने प्रदीपला वरचढ होण्याची संधी दिली नाही. त्यांनी तीन वेळा प्रदीप नरवालची सुपर टॅकल म्हणजे पकड केली.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.