पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श देशासमोर ठेवले- भोपळमध्ये भाषणात पंतप्रधान मोदींची बाबासाहेबांना श्रद्धांजली

मोदी म्हणाले, 'पद्मविभूषण' बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील, त्यांचा इतिहास सर्वसामान्यांपर्यंत नेण्यात दिलेले योगदान अमूल्य आहे. येथील सरकारने त्यांना कालिदास पुरस्कारही दिला. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे आदर्श बाबासाहेब पुरंदरे यांनी देशासमोर ठेवले, ते आदर्श आपल्याला सतत प्रेरणा देत राहतील. बाबासाहेब पुरंदरे यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.'

पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श देशासमोर ठेवले- भोपळमध्ये भाषणात पंतप्रधान मोदींची बाबासाहेबांना श्रद्धांजली
PM Modi in Bhopal
| Edited By: | Updated on: Nov 15, 2021 | 3:02 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. मोदी आदिवासी गौरव दिनानिमित्त आयोजित परिषदेला संबोधित करत आहेत. आदिवासी गौरव संमेलनाच्या मंचावर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पंतप्रधान मोदींचे बाण भेट देऊन त्यांचे स्वागत केले.

जनतेला संबोधित करताना, आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींना बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली दिली. मोदी म्हणाले, ‘पद्मविभूषण’ बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील, त्यांचा इतिहास सर्वसामान्यांपर्यंत नेण्यात दिलेले योगदान अमूल्य आहे. येथील सरकारने त्यांना कालिदास पुरस्कारही दिला. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे आदर्श बाबासाहेब पुरंदरे यांनी देशासमोर ठेवले, ते आदर्श आपल्याला सतत प्रेरणा देत राहतील. बाबासाहेब पुरंदरे यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.’