Narendra Modi:15 ऑगस्टचं भाषण द्याला जाण्यापूर्वी मोदी यांनी घेतली खास मित्रांची भेट, Video Viral
Narendra Modi Video: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. अशातच मोदी यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. काल 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांना लाल किल्ल्यावर भाषण द्यायला जायचे होते. पण मोदी यांनी लाल किल्ल्यावर येण्यापूर्वी त्यांच्या खास मित्रांची भेट घेतली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात. ते अनेक व्हिडिओ शेअर करत असतात. लोकांपर्यंत छोट्या छोट्या गोष्टी ते या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवत असतात. अशातच मोदी यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ हा कालचा जरी असला तरी त्यांनी तो आज शेअर केला आहे. काल 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांना लाल किल्ल्यावर भाषण द्यायला जायचे होते. त्यामुळे ते त्यांच्या निवस स्थानातून लवकर बाहेर पडले. पण मोदी यांनी लाल किल्ल्यावर येण्यापूर्वी त्यांच्या खास मित्रांची भेट घेतली आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ शेअर करत त्यांनी माहिती दिली आहे.
मोदी हे दररोज सकाळी त्यांच्या निवासस्थानी गायी आणि मोरांना चारा देतात. मात्र, शनिवारी, स्वातंत्र्यदिनी, पंतप्रधानांना लाल किल्ल्यावर पोहोचण्यासाठी त्यांच्या निवासस्थानातून लवकर निघावे लागले. पंतप्रधान मोदी निवासस्थानातून निघण्यापूर्वीच गायी आणि मोर त्यांच्याजवळ आले. पंतप्रधानांनी नेहमीप्रमाणे त्यांना स्वतःच्या हाताने चारा दिला.
पंतप्रधान मोदींनी रविवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले, “दररोज सकाळी माझ्या मित्रांना चारा देणे हा माझा नित्यक्रम आहे. काल (15 ऑगस्ट) सकाळी, मी लवकर निघणार आहे हे त्यांना कसेतरी कळले, म्हणून मी लाल किल्ल्याकडे जात असताना ते मला भेटायला आले. नेहमीप्रमाणेच, खास ठरलं!” व्हिडिओमध्ये दिसते की, पंतप्रधान मोदी निवासस्थानातून निघण्यापूर्वी गायी आणि मोर त्यांच्याजवळ येतात. पंतप्रधान स्वतःच्या हाताने गायी आणि मोरांना चारा देतात.
आजकाल पंतप्रधानांनी लोकांशी जोडले जाण्यासाठी एक नवीन पद्धत अवलंबली आहे. त्यांनी गेल्या काही दिवसांत इन्स्टाग्रामवर असेच अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय हातमाग दिनाच्या निमित्ताने एक नवीन इन्स्टाग्राम व्हिडिओ देखील प्रसिद्ध केला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी देशवासियांना 7 ऑगस्ट रोजी ‘नॅशनल हॅण्डलूम डे’ पूर्ण उत्साहाने आणि जल्लोषाने साजरा करण्याचे आवाहन केले. पंतप्रधान म्हणाले की, हाताने विणलेले कापड खरेदी करणे म्हणजे केवळ कापड खरेदी करणे नव्हे, तर देशातील लाखो विणकर आणि गरीब कुटुंबांची उपजीविका मजबूत करणे आहे. त्यांनी लोकांना हातमाग उत्पादनांचा वापर वाढवण्याचे आणि सोशल मीडियाद्वारे त्यांचा प्रचार करण्याचे आवाहन केले.