
पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदी यांनी काल गुजरातच्या सोमनाथ मंदिरात महादेवाची पूजा केली होती. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक वन्यजीव दिनानिमित्त जुनागढ येथे जंगली सफारीचा आनंद घेतला. जगभरात वाघांची संख्या स्थिर किंवा घटत असताना भारतात मात्र वाघांची संख्या सतत वाढतच आहे. यामागे भारत इकॉलॉजी आणि इकॉनॉमी यात अंतर राखत नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान पुढे म्हणाले की अन्नसाखळीत प्रत्येक प्राणी महत्वाचा भूमिका बजावत असतो, त्यामुळे त्याचे रक्षण करणे महत्वाचे असते असेही मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले.
PM Modi visits Gir Sanctuary
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारी वन्य जीव दिनानिमित्त राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या (NBWL) बैठकीचे अध्यक्षस्थान ते भूषवणार आहेत. त्यापूर्वी पंतप्रधान मोदी जुनागड जिल्ह्यातील गिर वन्यजीव अभयारण्याचे मुख्यालय असलेल्या सासन गिर येथे पोहोचले आणि त्यांनी जंगल सफारीचा आनंद घेतला. भारत हा असा देश आहे जिथे निसर्गाशी संबंधित गोष्टींचे संरक्षण करणे हा भारतीयांच्या संस्कृतीचा एक भाग आहे. भारताने वन्यजीवांच्या संरक्षणात अनेक चांगल्या गोष्टी केल्या आहेत. अनेक देशांमध्ये वाघांची लोकसंख्या स्थिर आहे किंवा कमी होत आहे, परंतु भारतात ती वेगाने का वाढत आहे? असा प्रश्न जगभरातील वन्यजीव प्रेमींच्या मनात असा निर्माण होत आहे, त्यांना याचा हेवा वाटत आहे असेही नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, भारतीय संस्कृती आणि आपल्या येथील समृद्ध जैव विविधता आणि पर्यावरणाबद्दल असलेली आपली नैसर्गिक ओढ ही या यशाचे कारण आहे. ते म्हणाले की, आम्ही इकॉलॉजी आणि इकॉनॉमी यांच्यातील वेगळेपणावर विश्वास ठेवत नाही, तर आम्ही दोघांमधील सह अस्तित्वाला महत्त्व देतो, म्हणजेच दोन्हीही देशासाठी तितकेच महत्त्वाचे आहेत असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे
pm modi visit gir Sanctuary
पृथ्वीवरील अविश्वसनीय जैवविविधतेचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी आपण आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला पाहिजे. निसर्गातील प्रत्येक प्रजातीची अन्न साखळीत स्वतःची महत्त्वाची भूमिका आहे. येणाऱ्या पिढ्यांसाठी त्यांचे भविष्य आपण सुरक्षित करूया. वन्यजीवांच्या संवर्धन आणि संरक्षणात भारताच्या योगदानाचा आम्हाला अभिमान आहे असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.