पीएम मोदी तोडणार नेहरूंचा रेकॉर्ड… केंद्रीय मंत्री आठवले यांनी असे का म्हटले ?

बिहार दौऱ्यावर आलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहरू यांचा रेकॉर्ड तोडतील असे म्हटले आहे. मोदी चौथ्यांदा सत्तेत येतील असेही त्यांनी सांगितले.

पीएम मोदी तोडणार नेहरूंचा रेकॉर्ड… केंद्रीय मंत्री आठवले यांनी असे का म्हटले ?
| Updated on: Mar 30, 2025 | 4:40 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी पंडित जवाहरलाल नेहरु यांचा रेकॉर्ड तोडतील आणि लागोपाठ चौथ्यांदा सत्ता कायम ठेवतील. केंद्रीय मंत्री रामदास आठवले बिहारच्या दौऱ्यावर आहेत. तीन दिवसांच्या दौऱ्यात त्यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली. रामदास आठवले यांनी  यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले की जेडीयू अध्यक्षांची प्रकृती उत्तम आहे आणि ते किमान पाच वर्षे तरी सत्तेत राहतील. आठवले यांनी महाराष्ट्रात अलिकडेच झालेल्या धार्मिक तणावासाठी ब्लॉकबास्टर चित्रपट ‘छावा’ ला जबाबदार ठरवले आणि संभाजीनगरातील औरंगजेबची कबर हटविण्याची मागणी बंद करावी असेही म्हटले आहे.

आपण जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनत आहोत

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले की मी नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या टीमचा हिस्सा असल्याचा मला अभिमान आहे.ज्यांच्या कारकीर्दीत आम्ही जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहोत. ते म्हणाले की मोदी लागोपाठ तिसऱ्यांदा सत्तेत परतून नेहरुंचा रेकॉर्डची बरोबरी करतील. मला विश्वास आहे की ते हा रेकॉर्ड तोडतील आणि सलग चौथ्यांदा सत्तेत येतील.

आठवले यांनी सांगितले की एक बौद्ध म्हणून मी बिहारचा सन्मान करतो. या भूमीत गौतम बुद्धांनी साल २,५०० वर्षांपूर्वी ज्ञान प्राप्त केले होते. महाबोधी मंदिर परिसर ज्याला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ घोषीत केले आहे. त्यावर संपूर्ण नियंत्रणाची मागणी करणाऱ्या बौद्धांच्या एकीला पाठींबा देत आठवले यांनी बोधगयाचा दौरा केल्याच्या एक दिवसानंतर मुख्यमंत्र्यांशी या मुद्यावर चर्चा केली आहे.

नितीश कुमारची प्रकृती चांगली आहे

आठवले यांनी सांगितली की बिहार ही सम्राट अशोकाची भूमी आहे. ज्यांनी भगवान गौतम बुद्धांचा संदेश जगभर पसरविला.आज बौद्ध धर्माचे अनुयायी ८० देशात पसरले आहेत. त्यांच्यासाठी हे दु:ख स्वाभाविक आहे की मंदिराचे संचलन करणारा ट्रस्टमध्ये अन्य धर्माचे सदस्य आहेत. असे साल १९५० च्या दशकात राज्य सरकारच्या वतीने पारित केलेल्या एका अधिनियमामुळे झाले आहे.

आपण नितीश कुमार यांना बौद्धांच्या समस्येवर उत्तर शोधण्याचा आग्रह केला आहे. गेल्या एक महिन्यांपासून बोधगया येथे बौद्ध धर्मगुरु निदर्शने करीत आहेत. मी स्वत: निदर्शने करणाऱ्यांची भेट घेतली आहे. या मुद्द्यांशी संबंधित क्षेत्राशी चर्चा करुन योग्य तो निर्णय घेण्याचे आदेश मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत असेही रामदास आठवले यांनी सांगितले.

रामदास आठवले यांनी जेडीयूची प्रशंसा केली आहे. त्यांनी सांगितले मी त्यांना तेव्हापासून ओळखतो जेव्हा ते अटलबिहारी यांच्या सरकारमध्ये रेल्वे मंत्री होते. नितीश कुमार यांचे आरोग्य उत्तम असल्याचे दिसत असल्याचेही आठवले यांनी सांगितले.

 नितीश कुमार पुढील 5-10 वर्षे सत्तेत राहतील

रामदास आठवले यांनी सांगितले की ते शारीरिक आणि मानसिक रुपाने अस्वस्थ असल्याचा अफवा पसरवण्यामागे आरजेडी आणि काँग्रेसची चाल आहे. हे दोन्ही पक्ष आगामी विधानसभा निवडणूकांमुळे तणावात आहेत. नितीश कुमार हे लालू यादव यांच्या पेक्षा स्वस्थ आहेत. मी दोघांचाही मित्र राहीलेला आहे. मला वाटते नितीशजी येत्या पाच वा दहा वर्षांपर्यंत सत्तेत राहतील. माझा पक्ष जरी बिहारमध्ये मजबूत नसला तरी मी त्यांना सांगितले की आहे मी राजदचा प्रचार करणार आहे असेही रामदास आठवले म्हणाले.