AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खिरीवर ताव, बच्चे कंपनीसोबत रमले… वाढदिवसाच्या दिवशी साक्षात पंतप्रधान पोहोचले लाभार्थ्यांच्या घरी

PM Narendra Modi 74th Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदी वाढदिवसाला मंगळवारी भुवनेश्वर येथे पोहचले. त्यांनी पंतप्रधान आवास योजनेच्या एका लाभार्थ्याच्या घरी भेट दिली. त्यावेळी लाभार्थ्याच्या सुनेने त्यांना खीर दिली. महिलांसाठी सुभद्रा योजनेची सुरुवात पण केली.

खिरीवर ताव, बच्चे कंपनीसोबत रमले... वाढदिवसाच्या दिवशी साक्षात पंतप्रधान पोहोचले लाभार्थ्यांच्या घरी
पंतप्रधान मोदींनी असा साजरा केला वाढदिवस
| Updated on: Sep 17, 2024 | 4:14 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 74 वा वाढदिवस आहे. आज त्यांनी ओडिशा राज्याचा दौरा केला. भुवनेश्वर येथे त्यांनी पंतप्रधान आवास योजनेच्या एका लाभार्थ्याची त्याच्या घरी जाऊन भेट घेतली. ते लाभार्थी कुटुंबाच्या गृह प्रवेशाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी पंतप्रधानांनी खीरीवर ताव मारला. तर बालगोपाळांसोबत त्यांनी गप्पा ही मारल्या. त्यांच्या आनंदात ते सहभागी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढदिवसाला भुवनेश्वर येथे 1 कोटी महिलांना मोठी भेट दिली. त्यांनी सुभद्रा योजनेचा शुभारंभ केला.

काय आहे सुभद्रा योजना

या योजनेतंर्गत 21 ते 60 वर्षाच्या जवळपास 1 कोटी महिलांना पुढील पाच वर्षांपर्यंत प्रत्येक वर्षाला 10,000 रुपयांची मदत देण्यात येत आहे. या योजनेतंर्गत प्रत्येक महिलेला एकूण 50,000 रुपयांची सहाय करण्यात येणार आहे. प्रत्येक वर्षी 10,000 रुपये रक्षाबंधन आणि आंतरराष्ट्रीय महिला दिवस या दोन हप्त्यात देण्यात येणार आहे.

खीरीवर मारला ताव

पंतप्रधान नरेंद्र मोदी या दौऱ्यात एका लाभार्थी कुटुंबाच्या घरी पोहचले. पंतप्रधान आवास योजनेत त्यांनी या घराचे उद्धघाटन केले. ते या घरात सुद्धा गेले. त्यावेळी लाभार्थ्याच्या सुनेने त्यांच्यासाठी खीर तयार करुन दिली. या आदिवासी कुटुंबाने मला खीर खाऊ घातली. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आपण कधी विसरू शकणार नाही, असे पंतप्रधान म्हणाले.

सुभद्रा योजनेची सुरुवात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले की, गेल्या 100 दिवसांत 11 लाख नवीन लखपती दीदी तयार झाल्या आहेत. भाजपच्या नवीन सरकारने आता आई आणि बहिणींसाठी सुभद्रा योजना सुरु केल्याचे ते म्हणाले. या योजनेतंर्गत महिलांना 50 हजार रुपयांची एकूण राशी देण्यात येणार आहे. त्याची रक्कम वेळोवेळी महिलांना देण्यात येईल. ही रक्कम थेट महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. विशेष म्हणजे आरबीआयच्या डिजिटल करन्सी पायलट प्रकल्पाशी ही योजना जोडण्यात येणार आहे. काही दिवसांनी या योजनेतील महिला डिजिटल स्वरुपात त्यांचा पैसा वापरू शकतील.

30 लाख कुटुंबाचा गृह प्रवेश

महिला सशक्तीकरणासाठी हे सरकार कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून छोट्या छोट्या गावातही आता महिलांच्या नावे घर होत आहे. आतापर्यंत 30 लाख कुटुंबाचा गृहप्रवेश झाल्याची माहिती त्यांनी दिली. आतापर्यंत 10 लाख लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाल्याची माहिती त्यांनी दिली.

खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का.
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?.
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?.
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.