PM मोदींचा गुजरातमधून राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल; जेन-झींसमोर नाराज ‘फुफा’ म्हणत डिवचलं, नेमकं काय म्हणाले?

PM नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधून राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी जेन-झींसमोर नाराज फुफा म्हणत राहुल गांधींना डिवचलं.

PM मोदींचा गुजरातमधून राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल; जेन-झींसमोर नाराज फुफा म्हणत डिवचलं, नेमकं काय म्हणाले?
narendra modi
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 08, 2026 | 1:30 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या वडोदरामध्ये ‘नमो फॉर विकसित भारत’ कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात मोदींनी जेन-झी तरुणांशी संवाद साधला. या संवादाआधी पंतप्रधान मोदींनी हजारो कोटींच्या विकासकामांचं लोकार्पण केलं. याच कार्यक्रमातून पंतप्रधान मोदींनी  काँग्रेस नेते राहुल गाधींवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी राहुल गांधी यांना नाराज फुफा म्हणत टीका केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘आज मी विकसित भारताच्या यात्रेला गती देण्यासाठी आलो आहे. थोड्यावेळापूर्वी हजारो रुपयांच्या विकासकामांचं भूमिपूजन झालं. मी देशातील जनतेचं अभिनंदन करतो. तुम्ही सर्वांनी सेवाभावातून स्वच्छतेचे अभियान राबवलं. त्यांचे आभार मानतो. काल एक व्हिडिओ बघत होता. गर्व वाटला. आता गणेशोत्सव, नवरात्रीची तयारी होत आहे. गणेशोत्सव, नवरात्रीत सर्वाचं लक्ष वडोदरावर असते. तुम्ही मागील एका आठवड्यापासून केलेल्या कामामुळे प्रत्येक कुटुंबात स्वच्छतेचं वातावरण तयार झालं. गणेशाचं आगमन होईल, त्यावेळी सर्व आशीर्वादाचा वर्षाव वडोदरावर होईल. या वर्षी लालकिल्ल्यावरून विकसित भारतासाठी संकल्पाच्या सप्तधारेची घोषणा केली. यात एक गतिशक्तीचाही समावेश आहे’.

‘विकसित भारतासाठी एक कनेक्टिव्हिटी हवी, जी काळाच्या पुढे जाणारी हवी. वडोदरा शहर गतिशक्तीचं विद्यापीठ आहे. आज 2800 किलोमीटरहून अधिकचा वेस्टर्न डेडिकेटे फ्रेट कॉरिडॉर पूर्ण झाला. एकविसाव्या शतकासाठी फार मोठं काम झालं आहे. हा कॉरिडॉर याचं प्रतिक आहे की, मागील 12 वर्षांत काम करण्याची संस्कृती बदलली आहे. याचा विचार सुरू झाला, त्यावेळी तुमचा जन्म झाला नव्हता. 2006 साली एक विशेष कंपनीची स्थापना झाली. त्यानंतर 2014 पर्यंत फाइलच इकडून तिकडे गेल्या. आता दुर्देवी बाब म्हणजे या फाइलला देखील कॉरिडॉर नशिबी नव्हता. 2014 साली गुजरातच्या लोकांनी मला दिल्लीत पाठवलं. आधीचं सरकार 2000 सालापर्यंत होतं. मला पाठवल्यानंतर ते गेले. खरंतर, सात आठ वर्षांत एक किलोमीटर फ्रेट कॉरिडॉरचं काम झालं नाही. त्यांच्या हिशोबानुसार सरकार चाललं असतं, तर तुमच्या पुढील तीन पिढ्या गेल्या तरी झालं नसतं. अशी हाल केले होते, असे ते म्हणाले.

‘आम्ही ट्रान्सफोर्टचा कायापालट केला आहे. आधी ट्रॅव्हल आणि ट्रान्सपोर्ट गतीशील नव्हते. परंतु या कॉरिडॉरने सर्व बदलून टाकलंय. आज दोन्ही कॉरिडॉरवर दररोज 4300 हून अधिक मालगाडी धावतात. आधी मालगाडी साडेसहा तासात 100 किलोमीटर धावायची. आता तीच मालगाडी अर्ध्या वेळात अंतर पूर्ण करते. या कॉरिडॉमुळे इंधनाची बचत होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

राहुल गांधी यांच्यावर टीका करताना मोदी म्हणाले, ‘ आता नाराज फुफा आहेत, आता ओरडतील. ट्रकवाल्यांचं काय होईल. ते कुठे जातील. ज्यांनी ट्रकची खरेदी केली, त्यांचं काय होईल. खरंतर आता मोठ्या प्रमाणात साहित्य हे देशाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात जाईल. आमच्यामुळे जिथे ट्रेन पोहोचली नाही, तिथे पोहोचली. आदिवासी क्षेत्रातील लोकही रेल्वेशी जुडले जात आहेत. आधी एक दोन ट्रेनची घोषणा व्हायची. आज वर्षभरात नवीन ट्रेन चालवल्या जात आहेत’.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us