
पहलगाममध्ये २२ एप्रिल २०२५ रोजी दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर हल्ला केला. यात २५ भारतीय आणि एक नेपाळी नागरिकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर भारताकडून ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. आता ऑपरेशन सिंदूरवर पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाष्य केले.
“आपण सर्वांनी गेल्या काही दिवसात देशाचं सामर्थ्य आणि संयम पाहिलं आहे. मी सर्वात आधी भारताच्या पराक्रमी सेना आणि सशस्त्र दल, आपल्या गुप्तचर एजन्सी, संशोधक प्रत्येक भारतवासियांकडून सॅल्यूट करतो. आपल्या वीर सैनिकांनी ऑपरेशन सिंदूरच्या लक्ष्याच्या प्राप्तीसाठी असिम शौर्य दाखवलं. मी त्यांच्या शौर्य, साहस, पराक्रमाला आज समर्पित करत आहे. आपल्या देशाच्या मातांना, बहिणींना आणि देशाच्या प्रत्येक मुलीला हा पराक्रम समर्पित करत आहे”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
“२२ एप्रिल रोजी पहलगाम रोजी दहशतवाद्यांनी जो हल्ला केला, त्याने देश आणि जगाला हादरवलं होतं. सुट्टी घालवणाऱ्या निर्दोष निष्पाप नागरिकांना धर्म विचारून कुटुंबासमोर, मुलांच्यासमोर बेरहमीने मारणं हा दहशतवादाचा बिभत्स चेहरा होता. क्रुरता होती. देशाच्या सद्भवाला तोडण्याचा हा प्रयत्न होता. माझ्यासाठी व्यक्तिगत रित्या ही पीडा मोठी होती”, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले.
“या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश, प्रत्येक नागरिक, प्रत्येक समाज, प्रत्येक वर्ग, सर्व पक्ष एका सुरात दहशतवादाच्या विरोध कठोर कारवाईसाठी एकजूटला. आपण दहशतवाद्यांना मातीत घालण्यासाठी भारतीय सैन्याला पूर्ण सुट दिली. आज प्रत्येक दहशतवादी, दहतवाद्यांचं प्रत्येक संघटनेला कळून चुकलंय की, आपल्या बहिणीच्या कपाळावरचं कुंकू पुसण्याचा परिणाम काय होतो. ऑपरेशन सिंदूर हे केवळ नाव नाही. ते देशाच्या कोटी कोटी लोकांची भावनाचं प्रतिबिंब आहे. ऑपरेशन सिंदूर न्यायची अखंड प्रतिज्ञा आहे. ६ मे रोजी रात्री उशिरा, ७ मे च्या सकाळी संपूर्ण जगाने या प्रतिज्ञेला परिणामात बदलेलं पाहिलं आहे. भारताच्या सैन्याने पाकिस्तानातील आतंकाच्या अड्ड्यावर, त्यांच्या ट्रेनिंग सेंटरवर अचूक प्रहार केला. दहशतवाद्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल, भारत एवढा मोठा निर्णय घेईल”, असेही मोदींनी म्हटले.