AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Narendra Modi: शॉर्टकटचे राजकारण करणाऱ्यांना एम्स कधीच बांधता येणार नाही; नरेंद्र मोदींची नाव न घेता काँग्रेसवर टीका; झारखंडमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते विकासकामांचे उद्घाटन

शॉर्टकटचे राजकारण करणारे कधीही नवे विमानतळ, नवे आधुनिक महामार्ग कधीच बांधणार नाहीत. शॉर्टकटचे राजकारण करणाऱ्यांना एम्स कधीच बांधता येणार नाही, प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेजसाठी मेहनत घेणार नाही असा जोरदार हल्ला नाव न घेता काँग्रेसवर त्यांनी टीका केली.

Narendra Modi: शॉर्टकटचे राजकारण करणाऱ्यांना एम्स कधीच बांधता येणार नाही; नरेंद्र मोदींची नाव न घेता काँग्रेसवर टीका; झारखंडमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते विकासकामांचे उद्घाटन
| Updated on: Jul 12, 2022 | 6:07 PM
Share

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pantpradhan Narendra Modi) आज झारखंड आणि बिहार दौऱ्यावर (Jharkhand and Bihar tour) होते, पंतप्रधान नरेंद्र मोदी झारखंडमधील देवघरला पोहचल्यानंतर त्यांनी तेथील विमानतळाचे उद्घघाटन केले. त्यानंतर 16,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनही त्यांच्याच हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमानंतर बाबा वैद्यनाथ मंदिरात (Baba Vaidyanath Temple) जाऊन त्यांनी दर्शन आणि पूजा केली. यावेळी त्यांनी बाबा वैद्यनात मंदिरामध्ये वीस मिनिटे पूजा केली. या कार्यक्रमप्रसंगी त्यांन कॉंग्रेसचे नाव न घेता जोरदार हल्ला चढविला. काॅंग्रेसवर शॉर्टकट राजकारणाचा ठपका ठेवत शॉर्टकटचे राजकारण करणारे कधीही नवे विमानतळ, नवे आधुनिक महामार्ग कधीच बांधणार नाहीत. शॉर्टकटचे राजकारण करणाऱ्यांना एम्स कधीच बांधता येणार नाही अशी जोरदार टीका त्यांनी यावेळी केली.

देवघरमधील कार्यक्रमाप्रसंगी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथील कार्यक्रमाचा गौरव करताना सांगितले की, देवघरमधील ही दिवाळी सगळा देश बघत आहे. हा क्षण माझ्यासाठीही आनंदाचा यासाठी आहे की, एकीकडे बाबा वैद्यनाथ यांचे आशिर्वाद तर दुसरीकडे तुमच्यासारख्या माणसांचे आशिर्वाद माझ्यामागे उभा आहे.

जनतेचा एकही पैसा वाया जाणार नाही

देशातील विकासाबाबत बोलताना ते म्हणाले की, देशातील विकास हा वाहता आणि प्रवाही राहण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. येथील जनतेचा आशिर्वाद हीच माझ्या आयुष्यातील मोठी कमाई आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, कोट्यवधींच्या योजनांचे लोकार्पण आज आम्ही करत आहोत. हे सांगत असतानाच ते म्हणाले की, जनतेचा एकही पैसा वाया जाणार नाही हाच आमचा संकल्प असल्याचेही त्यांनी सांगितले.

आम्ही लोकांच्या पै पैची किंमत जाणून आहोत

या देवघरामध्य शिवही आणि शक्तीही आहे, त्यामुळे भारत ही श्रद्धा आणि तीर्थक्षेत्र आहे. पूर्वी सरकारे गेल्यानंतर योजना पूर्ण होऊ शकत होत्या. पण आपण लोकांच्या पै पैची किंमत जाणून आहोत. येथील जनतेसाठी आम्ही वारसा जतन करण्यासाठी गुंतवणूक करत आहोत. त्यामुळे जनतेचा एक पैसाही वाया जाऊ नये असं आम्हाला वाटत आहे. भारतातील प्रत्येक कोपऱ्या कोपऱ्यामध्ये पर्यटनाची मोठी ताकद असल्याचेही त्यांनी सांगितले.

चहा विक्रेत्यांना त्यांचा मोठा फायदा

यावेळी त्यांनी सांगितले की, काशीतील पुनर्बांधणीनंतर बनारसमध्ये कित्येक पटींनी वाढ झाली आहे. तीन वर्षांपूर्वीच्या तुलनेत यंदा आतापर्यंत तीन पट अधिक भाविक तेथे गेले आहेत. हॉटेल, ढाबे, बोटी, ऑटो, फुलझाडे, पूजा साहित्य विकणारे आणि चहा विक्रेत्यांना त्यांचा मोठा फायदा होत असल्याचेही त्यांनी सांगितले.  देवघरामध्ये ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठ अशी दोन्ही असल्याचे सांगत त्यांनी आधीच्या सरकारावर टीका करत म्हणाले आधीच्या सरकारच्या वेळी योजना जाहीर झाल्या, मग एक-दोन सरकार आल्यानंतर उद्घघाटनाचे एक दोन दगड पडायचे. त्यानंतर दोन-चार सरकार बदलली की दुसराच कोणीतरी यायचा आणि तेथील योजनांसाठी विटा टाकल्या जायच्या अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

राजकीय अश्वासनांमध्ये अडकलेल्याना सक्षम केले

पंतप्रधानांनी काँग्रेसवर टीका करताना सांगितले की, गेल्या 8 वर्षांत आम्ही केवळ राजकीय अश्वासनांमध्ये अडकलेल्या नागरिकांना सक्षम केले आहे. त्यामध्ये गरीब,आदिवासी, दलित, मागासलेले आणि महिलांना प्रथम प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही आल्यानंतर आज त्या आपल्या प्राधान्यक्रमात पहिल्या स्थानावर आहेत. मला खात्री आहे की आज आपण सुरू केलेले प्रकल्प झारखंडच्या विकासाला नवी गती देणार आहे. आमच्यासाठी सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सर्वांचे प्रयत्न या केवळ घोषणा नाहीत, तर ती आमची प्राथमिकता आहे असंही त्यांनी सांगितले.

 शॉर्टकटचे राजकारण

आज आपल्या देशासमोर खरे आव्हान आहे ते प्रत्येक शॉर्टकट राजकारणाचे. सध्या देशात आकर्षक आश्वासने आणि शॉर्टकटचा अवलंब करून लोकांची मते मिळवण्याचाही प्रयत्न केला जातो आहे अशी टीका काँग्रेसचे नाव न घेता पंतप्रधान मोदींनी त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, मी देशवासीयांना शॉर्टकट राजकारणापासून दूर राहण्याचे आवाहन करत आहे. शॉर्टकटचे राजकारण करणारे कधीही नवे विमानतळ, नवे आधुनिक महामार्ग कधीच बांधणार नाहीत. शॉर्टकटचे राजकारण करणाऱ्यांना एम्स कधीच बांधता येणार नाही, प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेजसाठी मेहनत घेणार नाही असा जोरदार हल्ला नाव न घेता काँग्रेसवर त्यांनी टीका केली.

अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.