जगाच्या विकासाचा मार्ग काय? न्यू इकॉनमी फोरममध्ये PM मोदींचं विधान
'ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरमच्या कार्यक्रमात नरेंद्र मोदींनी हजेरी लावली. या कार्यक्रमात नरेंद्र मोदींनी भारताच्या विविधतेविषयी उपस्थितांना माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरम’च्या कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमाचे भारतात पहिल्यांदा आयोजन करण्यात आलं. अर्थव्यवस्थेशी निगडीत कार्यक्रमाचं योग्य वेळेत भारतात आयोजन केल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं. त्यावेळी त्यांनी सत्तेचे खरे मूल्य हे त्याचा वापर कसा होतो, यावर असते, असे नरेंद्र मोदींनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कार्यक्रमात सर्व मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी ब्लूमबर्ग यांचं कौतुक केलं. त्यांनी ब्लूमबर्ग आणि त्यांच्या मैत्रीविषयी भाष्य केलं. या कार्यक्रमात अर्थव्यवस्थेवर चर्चा होते. तंत्रज्ञान, एनर्जी आणि ग्लोबल अफेयर्सवर चर्चा होते. भारतात पहिल्यांदा या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. त्यांनी कार्यक्रमासाठी योग्य वेळ निवडली आहे’, असे त्यांनी सांगितले.
नरेंद्र मोदी काय म्हणाले?
नरेंद्र मोदी म्हणाले, आता फोरम नव्या सत्ता केंद्रावर लक्ष केंद्रीत तरक आहे. 21 व्या शतकातील तिसऱ्या दशकात मोठे बदल होत आहेत. जगात सत्ताकेंद्र बदलू लागले आहेत. तंत्रज्ञान, डेटा, ज्ञान, नाविन्यता ही सत्तेची केंद्र होत आहेत. आता सत्ता कोणाकडे हा प्रश्न नाही. तर प्रश्न असा आहे की, त्याचा वापर कसा होत आहे. तंत्रज्ञान फक्त काही लोकांना पुढे नेईल की, करोडो लोकांना पुढे नेईल? कोणाला नवीन संधी उपलब्ध निर्माण होईल. फक्त काही लोकांची ताकद वाढेल की सर्वांची क्षमता वाढवेल. येथून नवा विचाराचा जन्म होतोय. सत्ता ते सक्षम करणे…असा विचार निर्माण होत आहे. सत्तेच्या पुढेही अनेक विचार निर्माण होत आहे. सत्ता ते सक्षमीकरण या विचारासाठी आलो आहे. हा विचार भारतासाठी नवीन नाही. ज्ञान, धन आणि शक्ती ….ज्याच्याजवळ असेल, तो त्याचा वापर कसा करतो, हे महत्वाचं आहे. हाच विचार समजून घेतला पाहिजे. आम्ही परंपरेतून हे शिकलो आहे’.
मोदी पुढे म्हणाले, ‘भारतात 100 हून अधिक भाषा आहे. जवळपास 80000 नोंदणीकृत वृत्तपत्र आणि प्रकाशने आहेत. 1000 हून अधिक सॅटेलाईट्स टीव्ही चॅनल्स आहेत. भारतात 100 हून अधिक भाषणा बोलणारे जवळपास कोट्यवधी लोक आहेत. भारतात वेगवेगळ्या दृष्टीकोनावर चर्चा होते. सध्याच्या काळात या भाषा महत्वाच्या भूमिका निभावत आहे.