पंतप्रधानांनी ‘ऑपरेशन दोस्त’ सोबत शेअर केल्या गुजरात भूकंपाच्या आठवणी

गुजरात भूकंपाच्या वेळी स्वयंसेवक म्हणून काम करणाऱ्या गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची काही छायाचित्रे मोदीअर्काइव्हने ट्वीटरवर शेअर केली आहेत.

पंतप्रधानांनी ऑपरेशन दोस्त सोबत शेअर केल्या गुजरात भूकंपाच्या आठवणी
modi archive
Image Credit source: socialmedia
| Updated on: Feb 21, 2023 | 5:00 PM

नवी दिल्ली :  भूकंपग्रस्त तुर्कस्तानमध्ये बचावकार्य करून भारताचे पथक ‘ऑपरेशन दोस्त’ मायदेशात परतले आहे. या ‘ऑपरेशन दोस्त’ टीमच्या सदस्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी संवाद साधला. यावेळी त्यांनी ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना भूजमध्ये झालेल्या भीषण भूकंपाच्या आठवणी यावेळी त्यांनी यावेळी ‘ऑपरेशन दोस्त’च्या टीमला सांगत त्यांनी मुख्यमंत्र्याची खूर्ची सोडून एका सामान्य कार्यकर्ता वा स्वयंसेवक म्हणून कसे काम केले याच्या आठवणींना उजाळा दिला.

तुर्कस्तान आणि सिरीया येथे 6 फेब्रुवारी रोजी झालेल्या 7.8 रिश्टर स्केलच्या भूकंपात 28 हजाराहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. या भूकंपात अनेक जण कित्येक तासांनंतर ढीगाऱ्या खालून जीवंत बाहेर आले आहेत. भारताने आपली एनडीआरफ आणि डॉक्टरांची टीम मदतीकरीता तुर्कस्तानात पाठविली होती. ऑपरेशन दोस्त नावाची ही टीम मोहिम फत्ते करून भारतात परतली आहे. या टीमशी पंतप्रधान यांनी संवाद साधला.

आपण सर्वांनी 2001 च्या गुजरातच्या भीषण भूकंपाची छायाचित्रे पाहिली असतील. मोदी पुढे म्हणाले तेव्हा मी एक वॉलंटीयर म्हणून कच्छच्या जनतेच्या मदतीसाठी उतरलो. गुजरातमधील भुज येथे झालेल्या भूकंपाला मागील शतकातील सर्वात मोठा भूकंप म्हटले जाते. ढिगार्‍यातील लोकांना शोधणे, जखमींना वाचवणे आणि जखमींवर उपचार करणे किती कठीण आहे, हे मी स्वत: अनुभवले आहे. ज्या परिस्थितीत तुम्ही काम करता त्यासाठी तुम्हाला सॅल्यूट असे मोदी यांनी जवानांशी बोलताना सांगितले.

 

भूज भूकंपाच्या वेळी एक वॉलेंटीअर म्हणून काम करत असलेल्या गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची काही छायाचित्रे मोदी अर्काइव्हने ट्वीटरवर पोस्ट केली आहेत. त्या चित्रांमध्ये पंतप्रधान मोदी ढिगाऱ्या जवळ पाहणी करताना, बचाव पथकाशी बोलताना आणि बचाव कार्य वेगाने करण्याचा सल्ला देताना दिसत आहेत.

भूकंपाच्या ढिगार्‍यातून बाहेर काढलेल्या जखमींशी संवाद साधत मोदी त्यांच्या पाठीशी आपण आहोत असे आश्वासन देताना छायाचित्रात दिसत आहेत. मुख्यमंत्री पदाची खूर्ची सोडून मोदी यांनी भूकंपग्रस्तांसाठीच्या भोजन व्यवस्थेची तसेच अन्न शिजवण्याच्या कामावर कशी देखरेख केली हे या छायाचित्रात दिसत आहे.