
PM Modi Podcast With Lex Fridman: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वेळीस उपवास ठेवला होता. त्यावेळी त्यांनी 11 दिवसांचा उपवास ठेवला होता. अकरा दिवस कठीण तप केले होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुलाखतीपूर्वी अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रीडमन यांनी 45 तासांचा उपवास ठेवला. रविवारी नरेंद्र मोदी यांचा तीन तासांचा पॉडकास्ट प्रसारीत झाली. त्यावेळी हा खुलासा मोदी यांनी केला. तीन तासांच्या या पॉडकास्टमध्ये मोदी यांनी आपल्या जीवनातील अनेक अनुभव सांगितले आहे.
अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रीडमन यांच्याबाबत खुलासा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले, लेक्स फ्रीडमन यांनी मुलाखतीसाठी 45 तासांचा उपवास ठेवल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी या मुलाखतीपूर्वी 45 तास केवळ पाणी घेतले. यावेळी मोदी यांनी पॉडकास्टमध्ये उपवासाचे महत्व सांगितले. उपवासामुळे आपली इंद्रीये अधिक क्रियाशील होतात. मानसिक आरोग्य चांगले होते. तसेच शिस्त निर्माण होते, असे मोदी यांनी सांगितले.
उपवासाबद्दल बोलताना मोदी यांनी सांगितले की, उपवास म्हणजे केवळ जेवण सोडणे नाही. ती एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे. त्यांचा संबंध आयुर्वेदाशी आहे. शरीरातील विष कमी करण्यासाठी उपवास मदत करतो. उपवास करण्यापूर्वी तो चांगले हायड्रेट करतो. त्यामुळे उपवासच्या वेळी आळस वाटण्याऐवजी अधिक उत्साह वाटतो. तसेच शरीर आपल्याला आणखी कठोर परिश्रम करण्यास मदत करतो.
फ्रीडमन यांच्या उपवासावर मोदी म्हणाले, मला खरोखरच आश्चर्य वाटते आणि तुम्ही उपवास करत आहात याचा मला आनंद झाला. तुम्ही मला आदर देण्यासाठी उपवास करत आहात, हे पाहून मला आश्चर्य वाटले. याबद्दल मी तुमचे मनःपूर्वक आभार मानतो. भारतीय धार्मिक परंपरा ही खऱ्या अर्थाने जीवनपद्धती आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने एकदा हिंदू धर्माचा चपखल अर्थ लावला होता. त्यांनी म्हटले आहे की हिंदू धर्म हा कर्मकांड किंवा उपासनेच्या पद्धतींबद्दल नाही, तर ती एक जीवनपद्धती आहे.
शरीर, मन, बुद्धी, आत्मा आणि मानवता यांच्या उन्नतीसाठी आपल्या शास्त्रांमध्ये सखोल चर्चा आहे. हे साध्य करण्यासाठी ते विविध मार्ग, परंपरा आणि प्रणालींची रूपरेषा देतात आणि उपवास हा त्यापैकी एक आहे, परंतु केवळ उपवास हे सर्व काही नाही, असे मोदी यांनी म्हटले.