AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अयोध्येत राम लल्लाचा अभिषेक, पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख यजमान, काय सुरु आहे तयारी?

Ayodhya Ram Mandir News : अयोध्या येथील बहुचर्चित राम मंदिर येथे 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम होतोय. 16 जानेवारीपासून राम मंदिरात विधीनुसार पूजा केली जाणार आहे. त्या दृष्टीने तयारी सुरू झाली आहे. पंतप्रधान मोदी हे या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला यजमान म्हणून उपस्थित राहणार आहेत.

अयोध्येत राम लल्लाचा अभिषेक, पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख यजमान, काय सुरु आहे तयारी?
Ayodhya Ram Mandir
Mahesh Pawar
Mahesh Pawar | Updated on: Dec 05, 2023 | 6:35 PM
Share

उत्तर प्रदेश | 5 डिसेंबर 2023 : देशातील बहुचर्चित असलेल्या अयोध्या येथील राम मंदिराच्या उभारणीचे काम वेगाने पूर्ण करण्यात येत आहे. 22 जानेवारी रोजी अयोध्येतील या नव्याने बांधण्यात आलेल्या राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम मोठ्या भक्तीभावात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाचे प्रमुख यजमान म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम 22 जानेवारीला असला तरी 16 जानेवारीपासूनच विधीनुसार पूजेची प्रक्रिया सुरू होणार आहे. काशीचे अभ्यासक पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली हे सर्व विधी होणार आहेत.

अयोध्येच्या राम मंदिरात 16 जानेवारीपासून विधीनुसार पूजेची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्या दृष्टीने तयारी सुरू झाली आहे. पूजेसाठी मुख्य मंदिरासमोरील जागा निश्चित करण्यात आली आहे. येथे प्रत्येकी 45 फुटांचे दोन मंडप बांधण्यात येणार आहेत. सध्या मंडप बांधण्याचे काम सुरू झाले आहे. त्याचप्रमाणे एक यज्ञकुंड बांधला जाणार आहे. यामध्ये आणखी 9 विशेष हवनकुंड बांधले जाणार आहेत.

अयोध्येतील रामलल्लाच्या मूर्तीचा अभिषेक करण्यात आला होता. त्या विधीचे अध्यक्षपद हे काशीचे अभ्यासक पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांच्याकडे होते. त्यांच्याकडेच संपूर्ण प्राणप्रतिष्ठेच्या पूजेचे अध्यक्षस्थान सोपविण्यात आले आहे. १ डिसेंबरला पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांनी अयोध्येतील धार्मिक स्थळी भेट देत कार्यक्रमाच्या सूचना दिल्या.

काशीचे पंडित लक्ष्मीकांत दीक्षित आणि त्यांचे पुत्र अरुण दीक्षित हे या संपूर्ण कार्यक्रमाच्या नियोजनावर लक्ष ठेवून आहेत. रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा पुजेसाठी 2 मंडप, 9 हवनकुंड त्याचसोबत तलाव बांधण्यात येणार आहेत. ही सर्व कामे 10 जानेवारीपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. देशभरातील विविध शाखांचे 121 ब्राह्मण ही पूजा करणार आहेत. यात काशीतील सुमारे 40 विद्वानांचा समावेश असेल अशी माहिती पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांनी दिली.

गणेशपूजा, रामपूजा या सर्व पूजा एकाच मंडपात होणार आहेत. तर, दुसऱ्या छोट्या मंडपामध्ये प्रभू रामाच्या मूर्तीचे सर्व विधी पार पाडले जातील. ज्यामध्ये १०० कलश, अन्नाधिवास आणि जलाधिवास स्नान करण्यात येणार आहे. भारतातील सर्व राज्यांतून सर्व शाखांचे विद्वान यांना आमंत्रित केले जात आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

संपूर्ण भारतातील १२१ उच्चपदस्थ ब्राह्मण पूजा करतील असा निर्णय ट्रस्टने घेतला आहे. यामध्ये सर्व वेदांच्या अभ्यासकांचा समावेश असेल. प्राण प्रतिष्ठाशी संबंधित पूजा 16 जानेवारीपासून सुरू होणार आहे. ट्रस्टने नियुक्त केलेली व्यक्ती मुख्य यजमान असेल. तर, मुख्य पूजेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 22 जानेवारीला होणाऱ्या प्राण प्रतिष्ठामध्ये यजमानाची भूमिका बजावणार आहेत, अशी माहिती अरुण दीक्षित यांनी दिली.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी
जीव गेला तरी जमीन देणार नाही! शक्तीपीठ महामार्गाविरोधात 22 गाव...
जीव गेला तरी जमीन देणार नाही! शक्तीपीठ महामार्गाविरोधात 22 गावांतील शेतकरी आक्रमक
श्रीवर्धन आमचा अभेद्य बालेकिल्ला! महेंद्र दळवींच्या टीकेवर तटकरे...
श्रीवर्धन आमचा अभेद्य बालेकिल्ला! महेंद्र दळवींच्या टीकेवर सुनील तटकरेंचं सूचक उत्तर
रुपाली चाकणकरांच्या ट्रेडमार्कवर दिपाली सय्यद संतापल्या; थेट म्हणाल्या
Dipali Sayyed : रुपाली चाकणकरांच्या ट्रेडमार्कवर दिपाली सय्यद संतापल्या; थेट म्हणाल्या....