Premanand Maharaj: प्रेमानंद महाराजांनी जवळच्या संतांसह सोडलं आश्रम, एका रात्रीत गेले तरी कुठे? वृंदावनमध्ये उडालीये खळबळ

Premanand Maharaj: अनेकांना भक्तमार्गावर आणणारे प्रेमानंद महाराज आता कुठे आहेत, याबद्दल मोठी माहिती समोर आली. वादाच्या भोवऱ्यात अडकल्यानंतर प्रेमानंद महाराजांनी जवळच्या संतांसोबत आश्रम सोडलं आहे. सध्या घडत असलेल्या घटनांमुळे वृंदावनमध्ये खळबळ उडाली आहे.

Premanand Maharaj: प्रेमानंद महाराजांनी जवळच्या संतांसह सोडलं आश्रम, एका रात्रीत गेले तरी कुठे? वृंदावनमध्ये उडालीये खळबळ
Premanand Maharaj
| Updated on: Oct 06, 2026 | 9:20 AM

Premanand Maharaj: वृंदावन येथील प्रसिद्ध संत प्रेमानंद महाराज यांनी त्यांच्या जवळच्या संतांसोबत आश्रम सोडल्याच्या दाव्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. हा दावा संतं आणि स्थानिक हिंदूवादी नेत्यांनी केला आहे. असं देखील सांगण्यात येत आहे की, प्रेमानंद महाराज यामुना पार असलेल्या बेलवान आश्रमात आहे… पण प्रेमानंद महाराजांनी वृंदावन येथील आश्रम सोडलं आहे. याबद्दल कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण हा मुद्दा सध्या वादग्रस्त ठरत असून चर्चेत आला आहे.

दीपक लोधी याच्या मृत्यूनंतर वातावरण चिघळलं…

प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाशी संबंधित हे प्रकरण त्यांच्या शिष्याचा, दीपक लोधी उर्फ रसिक दुलारी शरण याच्या मृत्यूनंतर समोर आलं आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. 25 सप्टेंबर रोजी दीपकचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरूनही अनेक प्रश्न उपस्थित झाले. यानंतर दीपकच्या कुटुंबीयांनी आश्रमाबाहेर निदर्शने केली. या प्रकरणाबाबत ‘राधा केली कुंज ट्रस्ट’ने निष्पक्ष तपासात सहकार्य करण्याचं म्हटलं होतं.

Loading...

आश्रम सोडल्यानंतर दिनेश शर्मा यांचा दावा…

श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासचे अध्यक्ष दिनेश शर्मा फलाहारी, यांनी केलेल्या दाव्यानुसार, आश्रमात दोन वेगवेगळे गट तयार झाले आहे. याचा वातावरणामुळे दुःखी असलेले प्रेमानंद महाराज त्यांच्या विश्वासू संतांसह केली कुंजच्या जवळपास 20 किलोमीटर लांब बेलवन आश्रमात गेले आहेत. त्यांनी असे देखील आरोप केले आहे की, काही लोक संत परंपरेपासून दूर जमीन आणि संपत्तीच्या प्रकरणात देखील सक्रिय होते.

15 आश्रमांवर अतिक्रमणाचे आरोप

दिनेश शर्मा यांनी असाही आरोप केला आहे की, काही समाजकंटक आणि भूमाफियांशी संबंधित व्यक्तींनी वृंदावनमधील सुमारे 15 आश्रमांचा ताबा घेतला आहे. जमिनीशी संबंधित प्रकरणांमध्ये दबाव टाकण्यासाठी काही लोक प्रेमानंद महाराज यांच्या नावाचा वापर करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. एवढंच नाहीतर, त्यांनी महाराजांसाठी अधिक सुरक्षा पुरवण्याची मागणीही केली आहे. या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर, प्रेमानंद महाराज आपला आश्रम सोडून जाणार असल्याच्या वृत्तामध्ये किती तथ्य आहे, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

पोलिसांची कसून चौकशी सुरु

दीपक लोधी याच्या मृत्यूनंतर पोलीस सीसीटीव्ही फुटेज आणि फॉरेंसिक पुराव्यांचा तपास करत आहेत. तर दुसरीकडे प्रेमानंद महाराज यांनी आश्रम सोडलं आहे, या दाव्याने देखील खळबळ माजरी आहे. सध्या सर्वात मोठा प्रश्न हा उपस्थित होत आहे की प्रेमानंद महाराज खरंच आश्रम सोडून गेले आहेत की, हा फक्त एक दावा आहे .. आद सर्वांच्या नजरा अधिकृत माहिती आणि पोलिसांच्या चौकशीकडे लागलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us