
Premanand Maharaj Padyatra Controversy: वृंदावनमधील प्रसिद्ध संत प्रेमानंद महाराज यांचे देशात नाही तर विदेशातही भक्त आहेत. बॉलीवूडमधील कलाकार असो की उद्योजक त्यांच्या दर्शनासाठी येत असतात. प्रेमानंद महाराज रोज वृंदावनमधील छटीकरा रोड असलेल्या श्रीकृष्ण शरणम निवासस्थापासून श्री राधाकेली कुंजपर्यंत पदयात्रा काढत होते. त्यांच्या या पदयात्रेस एनआरआय ग्रीन सोसायटीमधील काही जणांनी विरोध केला. पदयात्रेमुळे लोकांना त्रास होत असल्याचे एनआरआय ग्रीन सोसायटीने म्हटले. त्यानंतर प्रेमानंद महाराजांनी पदयात्रा स्थगित केली. त्यानंतर वृंदावनमधील प्रेमानंद महाराजांच्या भक्तींनी एनआरआय ग्रीन सोसायटीच्या लोकांना गांधीगिरीच्या मार्गातून धडा शिकवला.
प्रेमानंद महाराज यांच्या पदयात्रेस विरोध करणाऱ्या लोकांच्या विरोधात वृंदावनमधील लोकांनी मोर्चा उघडला. त्यांनी आपल्या दुकानांच्या समोर एक बोर्ड लावला. त्या बोर्डावर एनआरआय ग्रीन सोसायटीच्या सदस्यांना सामान मिळणार नसल्याचे म्हटले. एनआरआय ग्रीन सोसायटीच्या विरोधात संपूर्ण वृंदावनमध्ये विरोध वाढू लागला. लोकांचा हा विरोध पाहून सोसायटीचे अध्यक्ष प्रेमानंद महाराजांना शरण आले. त्यांनी साष्टांग दंडवत घालत माफी मागितली. काही काही युट्युबरच्या प्रभावाखाली येऊन विरोध केला. आता आम्हाला खूप पश्चातापही होत आहे.
प्रेमानन्द महाराज जी
का विरोध करना NRI सोसाइटी वालों को महंगा पड़ापूरे वृन्दावन ने NRI सोसाइटी का बहिष्कार
कर दिया, न दूध दिया न अन्य कोई सामान..जब तड़पने लगा तो हो गया दंडवत महाराज जी के सामने NRI का सोसाइटी प्रेसिडेंट 🖐️
हाथ जोड़कर माफ़ी मांग रहा गिड़गिड़ा रहा
महाराज जी… pic.twitter.com/PutHz96ti3— Deepak Sharma (@SonOfBharat7) February 16, 2025
प्रेमानंद महाराज यांनी सांगितले की, आम्ही कोणाच्या विरोधात नाही. आमचे काम सर्वांना सुखी करणे हे आहे. आमच्या पदयात्रेमुळे कोणाला त्रास होत आहे, हे समजल्यावर त्या मार्गावरुन पदयात्रा स्थगित केली. मार्ग बदलला. सोसायटीचे अध्यक्ष माफी मागू इच्छिता. पण त्यांना समोर येण्याचे धाडस होत नाही? या प्रश्नावर संत प्रेमानंद महाराज म्हणाले, अरे नाही, नक्की या. त्या लोकांपर्यंतही आमची प्रार्थना पोहोचवा. आम्ही तुमचे कधीही नुकसान करू शकत नाही. सर्वांना आनंद देण्यासाठी आम्ही आलो आहोत. आम्ही कोणाला विरोध करू शकत नाही.
Premanand Maharaj Padyatra Controversy
संत प्रेमानंद महाराज यांची प्रकृती अस्वस्थ्य असल्याने आणि मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने पदयात्रा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली होती. त्यानंतर पदयात्रेची वेळ बदलून पदयात्रेचा मार्ग बदलला होता.