VIDEO: नरेंद्र मोदी यांचा खोल समुद्रात योगा, द्वारका नगरीला केला प्रणाम, व्हिडिओ व्हायरल

Narendra Modi | द्वारका या जलमग्न शहरात प्रार्थना करणे हा एक दिव्य अनुभव होता. मला अध्यात्मिक वैभव आणि शाश्वत भक्तीच्या प्राचीन युगाशी जोडले गेल्याचा अनुभव आला आहे. भगवान श्रीकृष्ण आपल्या सर्वांचे आशीर्वाद देईल.

VIDEO: नरेंद्र मोदी यांचा खोल समुद्रात योगा, द्वारका नगरीला केला प्रणाम, व्हिडिओ व्हायरल
नरेंद्र मोदी
| Edited By: | Updated on: Jun 19, 2024 | 7:13 PM

नवी दिल्ली, दि. 26 फेब्रुवारी 2024 | पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दिवसांपूर्वी लक्षद्वीपला गेले होते. त्या दौऱ्याची चांगलीच चर्चा झाली. आता पंतप्रधान गुजरातमधील द्वारका येथे पोहचले. या ठिकाणी समुद्रात द्वारका नगरी ज्या ठिकाणी बुडाली त्या जागेवर पोहचले. द्वारका नगरीला नमन केले. भगवान श्रीकृष्णाला अर्पण करण्यासाठी त्यांनी मोराची पिसे सोबत समुद्रात नेली होती. समुद्रात योगाही केला. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. समुद्रात द्वारका नगरीला भेट दिल्यानंतर मोदी म्हणाले की, मला अध्यात्मिक आणि ऐतिहासिक अनुभव आला. द्वारका या जलमग्न शहरात प्रार्थना करणे हा एक दिव्य अनुभव होता. मला अध्यात्मिक वैभव आणि शाश्वत भक्तीच्या प्राचीन युगाशी जोडले गेल्याचा अनुभव आला आहे. भगवान श्रीकृष्ण आपल्या सर्वांचे आशीर्वाद देईल.

नरेंद्र मोदी

मोदी यांना दिले विशेष प्रशिक्षण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमद्राखाली सुरक्षितपणे घेऊन जाण्यासाठी विशेष तयारी करण्यात आली होती. त्यासाठी मोदी यांना खोल समुद्रात डायव्हिंगचे विशेष प्रशिक्षण दिले गेले. तसेच सर्व आवश्यक सुरक्षा उपकरणे मोदी यांनी परिधान केली. पंतप्रधानांच्या या पावलाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. अनेकांनी लोकांनी त्याचे कौतुक केले आहे.

बेट द्वारकाला घेतले दर्शन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेट द्वारका येथील मंदिराला भेट दिली. त्या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर त्यांनी ओखा ते बेट द्वारका बेटाला जोडणाऱ्या २.३२ किमी लांबीच्या सागरी सेतू सुदर्शन सेतूचे उद्घाटन केले. हा देशातील सर्वात लांब केबल पूल आहे. या पुलाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2017 मध्ये केली होती. 900 कोटींहून अधिक खर्च करून हा पूल बांधण्यात आला आहे.

 

लक्षद्वीप भेट ठरली चर्चेची

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारी महिन्यात लक्षद्वीपला भेट दिली होती. त्यावेळी मोदी यांनी त्यांचे फोटो शेअर करताना देशवासीयांना सुट्टी घालवण्यासाठी लक्षद्वीपला येण्याचे आवाहन केले. लक्षद्वीप हे साहसी खेळांसाठी उत्तम ठिकाण असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या एका पोस्टमध्ये म्हटले होते.