इथिओपियामध्ये पंतप्रधानांचं भव्य स्वागत, स्वत: अबी अहमद अलींनी केलं मोदींच्या वाहनाचं सारथ्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इथिओपियावरून ओमानला रवाना झाले आहेत, मात्र त्यापूर्वी इथिओपियामध्ये नरेंद्र मोदी यांचं भव्य असं स्वागत करण्यात आलं, स्वत: इथिओपियाच्या पंतप्रधानांनी मोदींच्या वाहनाचं सारथ्य केलं.

इथिओपियामध्ये पंतप्रधानांचं भव्य स्वागत, स्वत: अबी अहमद अलींनी केलं मोदींच्या वाहनाचं सारथ्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इथिओपिया दौरा
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Dec 17, 2025 | 5:34 PM

सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. आपल्या या दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये बुधवारी मोदी इथिओपियावरून ओमानसाठी रवाना झाले आहेत. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जॉर्डन दौऱ्यावर होते, जॉर्डनवरून ते इथिओपियाला पोहोचले, त्यानंतर ते आता इथिओपियावरून ओमानसाठी रवाना झाले आहेत. इथिओपियामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. मोदी यांना इथिओपियाचा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्यानंतर त्यांनी तेथील संसदेला देखील संबोधित केलं. त्यानंतर जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी ओमानसाठी रवाना झाले, तेव्हा इथिओपियाचे पंतप्रधान स्वत: मोदी यांना निरोप देण्यासाठी विमानतळावर पोहोचले, यावेळी स्वत: इथिओपियाचे पंतप्रधान यांनी मोदी यांचं सारथ्य केलं. इथिओपियाच्या पंतप्रधानांनी स्वत: विमानतळापर्यंत गाडी चालवली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्यामुळे इथिओपियासोबत भारताचे संबंध आणखी मजबूत झाले आहेत, पूर्व आफ्रिकी देश असलेल्या इथिओपियासाठी भारताच्या पंतप्रधानांची ही भेट अनेक आर्थाने महत्त्वपूर्ण होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच इथिओपिया दौरा आहे, या दौऱ्यामध्ये दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इथिओपिया दौऱ्यामुळे दोन्ही देशांचे संबंध एवढे मजबूत झाले आहेत की, स्वत: इथिओपियाचे पंतप्रधान अबी अहमद अली स्वत: पंतप्रधान नरेद्र मोदी यांना निरोप देण्यासाठी कार चालवत त्यांच्यासोबत एअरपोर्टवर पोहोचले. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी जॉर्डवरून इथियोपियाची राजधानी असलेल्या अदीस अबाबाला पोहोचले, तेव्हा तिथे देखील जोरदार स्वागत करण्यात आलं. शांतीचा नोबेल पुरस्कार प्राप्त इथिओपियाचे पंतप्रधान अहमद अली यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मोठ्या थाटात स्वागत केलं. ते स्वत: कार चालवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या हॉटेलपर्यंत घेऊन गेले, तसेच त्यांनी मोदी यांना स्वत: कार चालवत त्यांच्या पुढील दौऱ्यासाठी विमानतळावर देखील सोडलं, इथिओपियावरून मोदी आता ओमानसाठी रवाना झाले आहेत.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इथिओपियामध्ये इथिओपियाचा सर्वोच्च सन्मान देऊन गौरव करण्यात आला.