AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात राज्यातून भाजपच्या मोठ्या नेत्याचा समावेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला नारळ देणार व कोणाला मंत्री करणार, याची खबरबात कोणालाच नाही. परंतु २०२४च्या निवडणुका लक्षात घेऊन काही वरिष्ठ मंत्र्यांना सरकारमधून पक्षात पाठवले जाणार असल्याचे निश्चित झाले आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात राज्यातून भाजपच्या मोठ्या नेत्याचा समावेश
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jan 07, 2023 | 8:21 AM
Share

नवी दिल्ली/मुंबई : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीची (bjp meeting )बैठक १६ व १७ जानेवारी रोजी नवी दिल्लीत होणार आहे. या बैठकीत २०२३ मध्ये निवडणुका असलेल्या राज्यांसंदर्भातील रणनिती तयार केली जाणार आहे. त्याचवेळी लोकसभेची २०२४ ची (Lok Shaba election) निवडणूक लक्षात घेऊन केंद्रीय मंत्रिमंडळाचा (cabinet minister )विस्तार होणार आहे. हा विस्तार कार्यकारणीच्या बैठकीनंतर व संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनापुर्वी होणार आहे. संसदेचे अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होणार आहे.

अनेक दिवसांपासून केंद्रातील नरेंद्र मोदी मंत्रिमंडळ विस्ताराच्या बातम्या येत होत्या. त्यामुळे विद्यामान मंत्र्यामध्ये अस्वस्था निर्माण झालीय. या विस्तारात चांगली कामगिरी नसणाऱ्या मंत्र्यांना डच्चू दिला जाणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबरोबरच भारतीय जनता पक्षात संघटनात्मक फेरबदल होण्याची शक्यता आहे. सोबतच केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातील काही चेहऱ्यांनाही संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारमध्ये अंतिम फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचवेळी मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटकासह नऊ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे. त्यादृष्टीने भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीत झालेल्या विचार मंथनानंतर मंत्रिमंडळात बदल होणार आहे.

मंत्रिमंडळात बदल करताना महाराष्ट्र भाजपमधील एका बड्या नेत्याचा समावेश केला जाणार असल्याची चर्चा सुरु झालीय. हा नेत्या विद्यामान शिंदे सरकारमध्ये मंत्री आहे. त्या नेत्यास आता केंद्रात जबाबदारी दिली जाणार आहे.

राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला मदत करणाऱ्या शिंदे गटाच्या काही चेहऱ्यांना केंद्रीय मंत्री मंडळ विस्तारात संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाच्या कोणत्या चेहऱ्यांना संधी मिळणार याकडेही राज्यातील जनतेसह राजकीय नेत्यांचं लक्ष लागलं आहे.

धक्कातंत्राची शक्यता पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला नारळ देणार व कोणाला मंत्री करणार, याची खबरबात कोणालाच नाही. परंतु २०२४च्या निवडणुका लक्षात घेऊन काही वरिष्ठ मंत्र्यांना सरकारमधून पक्षात पाठवले जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. तथापि, हे मंत्री कोण असतील, हे विस्तारा दरम्यान धक्कातंत्राच्या माध्यमातूनच समजणार आहे.

राज्यांना आणावा लागणार अहवाल

भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय कार्यकारणीच्या बैठकीत प्रत्येक राज्यानुसार अहवाल घेण्यात येणार आहे. आपल्या राज्यात पक्ष संघटना वाढवण्यासाठी काय केले? त्याचा अहवाल बैठकीत मांडावा लागणार आहे. बैठकीचे समापन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने होणार आहे. या भाषणातून पंतप्रधान व भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा पक्षाची भूमिका मांडणार आहे.

Follow Us
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ