सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली मोठी प्रार्थना, सरकारला मोठे यश..

सोनम वांगचूक यांनी तब्बल 26 दिवसानंतर आपले उपोषण सोडले. सोनम वांगचूक यांनी नीट परीक्षेच्या पेपरफुटीच्या मुद्द्यात उपोषण केले. त्यांची तब्येत खालावत होती. सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी त्यांना मोठा सल्ला दिला.

सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली मोठी प्रार्थना, सरकारला मोठे यश..
Prime Minister Narendra Modi
| Updated on: Jul 24, 2026 | 8:02 AM

नीट परीक्षेच्या पेपरफुटीच्या मुद्द्यात जंतर मंतरवर मोठे आंदोलन सुरू आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक जंतर मंतरवर उपोषणाला बसले. या उपोषणाला देशभरातून प्रतिसाद मिळाला. मात्र, सरकारने थेट सोनम वांगचूक यांना जंतर मंतरहून रूग्णालयात दाखल केले. त्यांची तब्येत खालावत होती. सोनम वांगचूक यांना रूग्णालयात दाखल केल्यानंतरही त्यांनी आपले उपोषण कायम ठेवले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याकरिता हे उपोषण सुरू होते. जंतर मंतवरहून सोनम वांगचूक यांना रूग्णालयात दाखल केल्यानंतर उपोषणाची कमान कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी हातात घेतली. अभिजीत दिपके पहिल्या दिवसापासून सोनम वांगचूक यांच्यासोबत जंतर मंतरवर आहेत. अभिजीत दिपकेंने थेट संसदेवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आणि आपले आंदोलन कायम ठेवले. मात्र, तिथेच आंदोलन चिघळले.

या आंदोलनाला देशभरातून प्रतिसाद मिळत आहे. दिवसेंदिवस या आंदोलनाची व्याप्ती वाढत आहे. सरकारकडून आंदोलकांसोबत चर्चा करण्यासाठी प्रस्ताव देण्यात आला. 24 तासात 4 वेळा सरकारने प्रस्ताव दिला. मात्र, आंदोलनकांनी याला दाद दिली नाही. यासोबत नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा करत नीट पेपरफुटीचे प्रकरण जलद कोर्टात चालवणार असल्याचेही जाहीर केले. पण अभिजीत दिपके धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत.

यादरम्यानच सरकारच्या शिष्टाईला मोठे यश मिळाले. अखेर 26 दिवसानंतर सोनम वांगचूक यांनी आपले उपोषण सोडले आहे. सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली. यादरम्यान त्यांनी सोनम वांगचूक यांना मोठा सल्ला देखील दिला. आता पंतप्रधानांची ही पोस्ट व्हायरल होत आहे.

नरेंद्र मोदी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, मी सोनमजींना आग्रह करतो की, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपला दिनक्रम पाळावा. लवकरात लवकर आपले पूर्वीचे वजन पुन्हा मिळवावे. मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो की सोनमजी निरोगी राहतील, आता नरेंद्र मोदी यांची हीच पोस्ट व्हायरल होत आहे. सोनम वांगचूक यांच्या आरोग्यासाठी त्यांनी प्रार्थना केली.

Follow Us