AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BRICS Summit : शी जिनपिंग यांना भारतात बोलावून मोदींनी चांगलंच सुनावलं, चीनला उघड उघड थेट मोठा इशारा

भारतामध्ये ब्रिक्स शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिखर परिषदेचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. या शिखर परिषदेमध्ये भारताकडून चीनला उघड-उघड मोठा इशारा देण्यात आला आहे.

BRICS Summit : शी जिनपिंग यांना भारतात बोलावून मोदींनी चांगलंच सुनावलं, चीनला उघड उघड थेट मोठा इशारा
BRICS SummitImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 13, 2026 | 5:05 PM
Share

भारतामध्ये ब्रिक्स शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिखर परिषदेचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. या ब्रिक्स शिखर परिषदेमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्याही देशाचं नाव न घेता रेअर अर्थ खनिजांच्या वापरावरून आणि त्यावर असलेल्या चीनच्या मक्तेदारीवरून उघड-उघड मोठा इशारा दिला आहे. रेअर अर्थ खनिजांचा वापर हा शस्त्रासारखा करू नका, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स शिखर परिषदेमध्ये बोलत होते, तेव्हा तिथे समोरच चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग देखील बसलेले होते.

रेअर अर्थ खनिजांच्या वापरावर कोणत्याही एका देशाची मक्तेदारी असता कामा नये, रेअर अर्थ खनिजांच्या वापरासंदर्भात सर्वसमावेशकता असावी, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शी जिनपिंग यांच्यासमोरच म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलताना कोणत्याही देशाच नाव न घेता रेअर अर्थ खनिजांवरून इशारा दिला आहे, मात्र हा इशारा चीनसाठीच असल्याचं मानलं जात आहे. कारण सध्या रेअर अर्थ खनिजांवर संपूर्णपणे चीनची मक्तेदारी आणि एकाधिकार शाही असल्याचं दिसून येत आहे.

जगात जेवढं रेअर अर्थ खनिज आहे, त्यापैकी 90 टक्के रेअर अर्थ खनिज हे चीनकडे आहे. त्यामुळे या क्षेत्रात चीनचा चांगलाच दबदबा आहे. या रेअर अर्थ खनिजांचा वापर, सेमीकंडक्टर, इलेक्ट्रिक व्हेकल्स ईव्ही, एआय डेटा सेंटरसाठी केला जातो. मात्र यावर चीनचा एकाधिकार आहे, दरम्यान यावरूनच आता भारताने चीनला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्याही देशाचं नाव न घेता रेअर अर्थ खनिजांच्या वापरावरून आणि त्यावर असलेल्या चीनच्या मक्तेदारीवरून उघड-उघड आपली भूमिका जाहीर केली आहे.

दरम्यान अमेरिकेनं जेव्हा चीनसोबत टॅरिफ वॉर सुरू केलं होतं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेव्हा चीनवर भरमसाठ टॅरीफ लावला होता. तेव्हा देखील चीनकडून अमेरिकेला होणारा रेअर अर्थ खनिजांचा पुरवठा थांबवण्यात आला होता. त्यामुळे अमेरिकेची मोठी कोंडी झाली होती.

Follow Us
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?
जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का!
Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का! 19 सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता...
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता सलाईन आणि पाणीही...
गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?-जरांगे
Manoj Jarange Patil | गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?
मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
Mumbaicha Raja 2026 | मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला;
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला; म्हणाले, 'वातावरण खराब होऊ नये...
महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम!
Mahendra Thorave | महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम! महेंद्र थोरावेंचा राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल