देशद्रोही कोण ते समोरासमोर चर्चा करु; राहुल गांधीचं PM मोदींना पुन्हा चर्चेचं खुलं आव्हान, म्हणाले, मोदीजी 24 तास झाले….

विरोधकांना देशविरोधी ठरवण्यावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुल्या चर्चेचं आव्हान दिलं आहे. परकीय शक्तींशी कोणाचे संबंध आहेत, यासह अमेरिका करार, अदानी आणि एपस्टीन प्रकरणावरही चर्चा करण्याची तयारी त्यांनी दर्शवली. या चर्चेसाठी मोहन भागवत यांना परीक्षक म्हणून नेमण्याचीही तयारी असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

देशद्रोही कोण ते समोरासमोर चर्चा करु; राहुल गांधीचं PM मोदींना पुन्हा चर्चेचं खुलं आव्हान, म्हणाले, मोदीजी 24 तास झाले....
Rahul Gandhi Challenges Narendra Modi
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 03, 2026 | 8:32 PM

गेल्या अनेक दिवसांपासून देशातलं राजकारण एसआयआरमधील कथित घोळ आणि इतर युवकांच्या प्रश्नांभोवती फिरत आहे. मुख्य निवडणूक आयुक्त यांच्या राजीनाम्याची मागणी, त्यासाठी विरोधकांचं दिल्लीतलं मोठं आंदोलन आणि त्यातच आता भर पडली आहे, ती राहुल गांधी विरुद्ध पीएम मोदी यांच्या राजकीय लढाईची. राहुल गांधी यांचं पीएम नरेंद्र मोदी यांना समोरासमोर चर्चेचं आव्हान आलं आहे. देशद्रोही कोण, परदेशी शक्तींशी कोणाचे संबंध? यावर चर्चा करु, असं राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. या ट्विटमधून त्यांनी आपण समोरासमोर चर्चा करु, असं आव्हान राहुल गांधींनी मोदींना दिलं आहे.

राहुल गांधींनी नेमकं काय म्हटलंय?

मोदीजी, तुम्हाला मी आव्हान देऊन 24 तास उलटले आहेत. तुम्ही विरोधकांना देशविरोधी ठरवता. मग चला, कोणत्याही व्यासपीठावर, कोणत्याही ठिकाणी माझ्याशी जाहीर चर्चा करा. देशविरोधी कोण आहे? परकीय शक्तींशी कोणाचे संबंध आहेत? आणि हे संबंध नेमके कशा स्वरूपाचे आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरे खुल्या चर्चेतून समोर येऊ द्या. लवकरात लवकर ही चर्चा घडवून आणा. घाबरू नका.

Loading...

या चर्चेला आपण दोघेही उपस्थित राहू. माध्यमांचे प्रतिनिधी असतील, देशातील तरुणाईही असेल. समोर एक टेबल असेल. तुम्ही एका बाजूला बसा आणि मी दुसऱ्या बाजूला बसतो. या चर्चेसाठी तुम्हाला हवा तो परीक्षक नेमा. अगदी मोहन भागवतजींनाही परीक्षक म्हणून बसवायला माझी हरकत नाही.

या चर्चेत देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर, आर्थिक धोरणांवर प्रश्न उपस्थित होतील. अमेरिकेसोबतचा करार नेमका कसा झाला, तो करण्याची घाई का करण्यात आली, इतक्या कमी वेळेत हा निर्णय का घेतला? हा निर्णय तुम्ही एकट्यानेच का घेतला? मंत्रिमंडळाला त्याची माहिती का देण्यात आली नाही? अदानी प्रकरण का बंद करण्यात आले? एपस्टीन प्रकरणासह अशा अनेक मुद्द्यांवर आपण सविस्तर आणि खुली चर्चा करू.

चला, दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाऊ द्या. सत्य काय आहे, हे देशासमोर स्पष्ट होऊ द्या.

तुम्ही माझ्यावर आरोप करता ना? मग या, समोरासमोर चर्चा करूया. या चर्चेतून सर्व गोष्टी स्पष्ट होतील.

इतर प्रकरणांमध्ये तुम्ही माझ्याविरोधात मानहानीचे खटले दाखल केले आहेत. माझ्या मते, असे सुमारे 45 खटले माझ्यावर दाखल आहेत. मात्र, परकीय शक्तींशी संबंध असल्याच्या आरोपांवर चर्चा करण्याचे मी आव्हान दिल्यानंतर तुम्ही मानहानीचा खटला दाखल केलेला नाही. मग या मुद्द्यावरही खटला दाखल करा. त्यावरही आपण जाहीरपणे चर्चा करू.

मोदीजी, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

पुन्हा एकदा सांगतो, तुम्हाला दिलेल्या आव्हानाला 24 तास उलटले आहेत. आता चर्चा करण्यासाठी पुढे या. घाबरू नका.

आधी दिलेलं आव्हान काय होतं?

दरम्यान, सोमवारी राहुल गांधी यांनी मोदीजी खोटं बोलणं थांबवा, तुम्ही परकीय मदतीने पंतप्रधान झाला आहात. त्यामुळेच तुम्ही आजही पदावर आहात. तुमची अर्थव्यवस्था परकीय हितसंबंधांच्या नियंत्रणाखाली आहे. त्यांना तुम्ही पाठिंबा दिला आबे. परकिय सोशल मीडियाही तुमच्या बाजून आहे. मी या विषयावर तुम्हाला खुलं चर्चेचं आव्हान देतो, कोणतंहीव व्यासपीठ, वेळ तुम्ही म्हणाल तीस हिंमत असेल तर या, तुम्ही येणार नाहीत, कारण तुम्हाला भीती वाटत असावी, असं राहुल गांधी यांनी मोदींना यापूर्वी आव्हान दिलं होतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us