Rahul Gandhi tests covid positive : राहुल गांधी यांना कोरोनाची लागण

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कोरोना संसर्ग झाला आहे. त्यांनी ट्विटवरुन ही माहिती दिली.

Rahul Gandhi tests covid positive : राहुल गांधी यांना कोरोनाची लागण
Rahul Gandhi
| Updated on: Apr 20, 2021 | 3:35 PM

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कोरोना संसर्ग झाला आहे. सौम्य लक्षण दिसू लागल्यानं चाचणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती राहुल गांधी यांनी ट्वीटद्वारे दिली आहे. दोन दिवसांपूर्वी देशात कोरोना संसर्ग वाढत असल्यान त्यांनी बंगालमधील प्रचारसभा रद्द केल्या होत्या. राहुल गांधी यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनी सुरक्षित राहण्याचं आवाहन केलं आहे.   (Rahul Gandhi tested corona positive informed by tweet appeal to follow corona protocol)

राहुल गांधी यांचं ट्विट

राहुल गांधी नेमक काय म्हणाले?

कोरोना विषयक लक्षणं जाणवू लागल्यानंतर कोरोनाची चाचणी केली होती.  कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती राहुल गांधी यांनी दिली. अलीकडच्या काळात जे संपर्कात आले होते, त्यांनी कोरोनासंदर्भातील नियमांचं पालन करावं. कोरोना चाचणी करुन घ्यावी आणि सुरक्षित राहावं, असं आवाहन राहुल गांधी यांनी केलं आहे.

कोरोना वाढत असल्यानं पश्चिम बंगालमधील सभा रद्द 

कोरोना विषाणू संसर्ग वाढत असल्यानं पश्चिम बंगालमधील राहिलेल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी प्रचार करणार नसल्याचं राहुल गांधी यांनी जाहीर केले होते. राहुल गांधी यांनी इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांना सभांबाबत विचार करण्याचं आवाहन केलं होतं. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि डाव्या पक्षांची आघाडी आहे.

कोरोनामुळं होणाऱ्या मृत्यूबाबत चिंता व्यक्त

देशात 24 तासात 261500 नवे रुग्ण सापडले आहेत. तसेच 1501 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यावर राहुल गांधी यांनी गंभीर चिंता व्यक्त केली होती. अशा प्रकारे मरणाऱ्यांची आणि रुग्णांची संख्या पहिल्यांदाच पाहिली आहे, असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.

मनमोहन सिंग यांना कोरोना 

देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती सोमवारी समोर आली होती. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं आहे. नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात मनमोहन सिंग यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

 संबंधित बातम्या

Manmohan Singh : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोरोना संसर्ग, दिल्लीतील एम्समध्ये दाखल

Rahul Gandhi: राहुल गांधींचा मोठा निर्णय; बंगालमधील रॅलींबाबत सर्वपक्षीय नेत्यांना केलं ‘हे’ आवाहन

(Rahul Gandhi tested corona positive informed by tweet appeal to follow corona protocol)