‘स्वत:ची देवाशी तुलना, हा अहंकार…’, राहुल गांधी यांनी शिव-पार्वतीचा फोटो शेअर करताच भाजपाची प्रखर टीका

राहुल गांधी यांनी शेअर केलेल्या शिवपार्वतीच्या फोटोनंतर भाजपने पुन्हा त्यांच्यावर पलटवार केला आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी बोचरी टीका केली आहे.

स्वत:ची देवाशी तुलना, हा अहंकार..., राहुल गांधी यांनी शिव-पार्वतीचा फोटो शेअर करताच भाजपाची प्रखर टीका
RHAUL GANDHI POST
| Updated on: Nov 20, 2026 | 7:32 PM

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी समाजमाध्यमावर नुकतेच भगवान शंकर आणि देवी पार्वती यांच्या शिल्पाचा एक फोटो शेअर करत भाजपाच्या ट्रोलना उत्तर दिले आहे. या फोटोनंतर पुन्हा भाजपाने राहुल गांधी हे स्वत:ची तुलना देवाशी करत आहे. त्यांच्या किती अहंकार भरला आहे अशी टीका आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी शिव आणि पार्वतीचा फोटो का शेअर केला या मागे नेमके काय घडले हे पाहूयात…

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी १७ नोव्हेंबर रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या शिल्पाचा फोटो शेअर केला होता. या फोटोतील भगवान शंकराच्या मांडीवर देवी पार्वती विराजमान झाली आहे. या फोटोआधारे राहुल यांनी भाजप आणि आरएसएस (RSS) समर्थकांवर टीका केली होती.

Loading...

राहुल गांधींच्या पोस्टमधील नेमका मजकूर

आपल्या आई सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यात राहुल यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून त्यांना भाजपा आणि संघाच्या ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. संघाच्या ट्रोलना उत्तर देताना राहुल गांधी यांनी काय पोस्ट केली ते पाहा.

राहुल गांधी यांची पोस्ट काय?

“भीती, राग आणि द्वेषाने भाजप आणि आरएसएस समर्थकांच्या हृदयात एक असे जाळे विणले आहे, जे त्यांना प्रेम अनुभवण्यापासून आणि व्यक्त करण्यापासून रोखते. एक सच्चा हिंदू म्हणून, त्यांना या जाळ्यातून मुक्त करणे हे माझे कर्तव्य आहे, जेणेकरून तेही त्यांच्या जीवनात प्रेम आणि आपलेपणाचे अद्भुत सौंदर्य आणि आनंद अनुभवू शकतील.”

  • सत्यम शिवम सुंदरम

या पोस्टमागील नेमके प्रकरण काय?

सोनिया गांधी यांच्या ‘Belonging: A Journey of Love’ या पुस्तकाचे प्रकाशन नवी दिल्लीत झाले. त्यावेळी आपल्या बालपणीच्या आठवणी सांगताना राहुल गांधी म्हणाले होते की, “जेवताना पापा (राजीव गांधी) असायचे आणि त्यांच्या मांडीवर मम्मी (सोनिया गांधी) बसायची.” यावरुन भाजपाने टीका केली आहे.

भाजपचे ट्रोलिंग

राहुल गांधींच्या या विधानावरून आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यासह अनेक भाजपा नेते आणि सोशल मीडिया युजरनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका करीत त्यांची खिल्ली उडवली होती. त्यानंतर राहुल गांधी यांनी शिव-पार्वतीचा फोटो शेअर केला आहे. राहुल गांधींनी शेअर केलेला फोटो कर्नाटकातील हळेबीडू येथील १२ व्या शतकातील होयसलेश्वर मंदिरातील आहे. या शिल्पात भगवान शिव नंदीवर विराजमान असून माता पार्वती त्यांच्या मांडीवर बसलेल्या दिसत आहेत.

भाजपाची बोचरी टीका

राहुल गांधी यांनी शेअर केलेल्या शिव-पार्वतीच्या फोटोनंतर भाजपने पुन्हा पलटवार केला आहे. या पोस्टनंतर भाजपने राहुल गांधींवर पुन्हा निशाणा साधला. कोणत्याही सामान्य माणसाची तुलना थेट देवांशी करणे अयोग्य असून हा अहंकार असल्याची टीका मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केली. तसेच हळेबीडू येथील या मंदिरावर ऐतिहासिक काळात झालेल्या आक्रमणांचा उल्लेख करीत भाजपाने काँग्रेसवर टीका केली आहे.

 

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us