AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वेचे कन्फर्म तिकीट नसेल तर स्टेशनवर लवकर ‘नो एन्ट्री’, नवीन व्यवस्था नेमकी काय?

Confirmed Ticket Rule IRCTC: रेल्वे मंत्रालयाने स्टेशनवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड तयार केला आहे. या लोकांनी ड्रेससोबत आयकार्ड दिले जाणार आहे. त्यामुळे प्लॅटफॉर्मवर केवळ व्हॅलिड लोकांनाच प्रवेश दिला जाईल.

रेल्वेचे कन्फर्म तिकीट नसेल तर स्टेशनवर लवकर 'नो एन्ट्री', नवीन व्यवस्था नेमकी काय?
Railway
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Mar 20, 2025 | 8:45 PM
Share

Confirmed Ticket Rule IRCTC: भारतीय रेल्वेने नवीन नियम लागू करण्याची तयारी केली आहे. या निर्णयामुळे वेटींग तिकीट किंवा जनरल तिकीट असल्यावर रेल्वे प्लॅटफॉर्मवर लवकर प्रवेश मिळणार नाही. या प्रवाशांना रेल्वे येण्याच्या काही वेळेपूर्वीच प्रवेश मिळणार आहे. देशातील ६० रेल्वे स्टेशनवर ही व्यवस्था प्रायोगिक तत्वावर लागू करण्यात येणार आहे. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ही प्रणाली तयार केली आहे. नुकतेच दिल्ली स्टेशनवर गर्दीमुळे चेंगराचेंगरीची घटना घडली होती. त्यात १८ जणांचा मृत्यू झाला होता.

नवी दिल्ली, आनंद विहार, सूरत, वाराणसी, अयोध्या आणि पटणा स्टेशनसह एकूण ६० स्टेशनवर ही व्यवस्था लागू करण्यात येणार आहे. या सर्व स्टेशनची यादी अद्याप जाहीर झाली नाही. परंतु त्यात मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

काय काय करणार उपाययोजना

  • तिकिटांची विक्री ट्रेनच्या क्षमतेनुसार करण्यात येणार.
  • रेल्वे स्टेशनवर कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड असणार.
  • जनरल किंवा वेटींग तिकीट धारकांसाठी स्टेशनबाहेर वेटींग एरिया.
  • ट्रेन प्लॅटफॉर्मवर येईल, त्यावेळीच वेटींग तिकीट अन् जनरल तिकीट धारकांना स्टेशनवर जात येणार.
  • स्टेशनवर एका प्लॅटफॉर्मवरुन दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी रुंद फूट ओव्हार ब्रिज असणार. हे ब्रिज 12 लांब आणि 6 मीटर रुंद असणार. या पुलांचे दोन डिझाइन तयार.
  • सर्व स्टेशन सीसीटीव्हीच्या निगरानीखाली असणार.

कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड तयार

रेल्वे मंत्रालयाने स्टेशनवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड तयार केला आहे. या लोकांनी ड्रेससोबत आयकार्ड दिले जाणार आहे. त्यामुळे प्लॅटफॉर्मवर केवळ व्हॅलिड लोकांनाच प्रवेश दिला जाईल. आपत्कालीन परिस्थितीत ड्रेसकोडमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांची ओळख केली जाईल. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतीच रेल्वे स्टेशनवरील गर्दीच्या नियंत्रण करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्या बैठकीनंतर विविध उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आली. सुरुवातीच्या टप्प्यात ६० स्टेशनवर ही योजना राबण्यात येणार आहे. त्यानंतर टप्पा टप्प्याने देशातील सर्वच स्टेशनवर ही प्रणाली लागू होईल.

हे ही वाचा…

रेल्वेच्या प्रत्येक तिकीटधारकास किती मिळते ‘सबसिडी’? शेजारच्या देशांमध्ये किती आहे रेल्वे भाडे?

Follow Us
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ