AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुढील 3-4 दिवसांत या राज्यात सुरु होणार पाऊस, मान्सूनबाबत आली मोठी गुडन्यूज

मान्सून आज केरळमध्ये दाखल झाला आहे. अशी अधिकृत माहित भारतीय हवामान खात्याने दिली आहे. मान्सून केरळमध्ये दाखल होताच अनेकांना दिलासा मिळाला आहे. कारण यानंतर काही दिवसातच मान्सून वेगवेगळ्या राज्यांमध्ये पोहोचणार आहे. मान्सून महाराष्ट्रात कधी पोहोचणार जाणून घ्या.

पुढील 3-4 दिवसांत या राज्यात सुरु होणार पाऊस, मान्सूनबाबत आली मोठी गुडन्यूज
| Updated on: May 30, 2024 | 4:53 PM
Share

Monsoon Update : मान्सून केरळमध्ये पोहोचल्याची औपचारिक घोषणा हवामान खात्याने केली आहे. साधारणपणे मान्सूनहा दरवर्षी 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होत असतो. पण यंदा तीन दिवस आधीच त्याने हजेरी लावली आहे. IMD चे शास्त्रज्ञांनी सांगितले की, सर्व परिस्थितीचे आकलन केल्यानंतर आज केरळमध्ये मान्सूनच्या आगमन झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. मान्सूनने केरळचा बहुतांश भाग आणि ईशान्येकडील अनेक भाग व्यापला आहे. त्यामुळे पुढील 3-4 दिवसांत तामिळनाडू आणि कर्नाटकचा काही भाग तसेच उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि उर्वरित ईशान्य राज्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे.

अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, नागालँड, मेघालय, मिझोरम, मणिपूर आणि आसाममध्ये ५ जून रोजी मान्सून दाखल होणार आहे. हवामानशास्त्रज्ञांनी सांगितले की, रविवारी पश्चिम बंगाल आणि बांगलादेशातून गेलेल्या चक्रीवादळ रामलने मान्सूनचा प्रवाह बंगालच्या उपसागराकडे खेचला आहे. त्यामुळे मान्सूनचे लवकर आगमन होत आहे.

उत्तर-पश्चिम भारत आणि दिल्लीत उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. येथे लवकरच रिमझिम पावसासह गडगडाटी वादळाचा अंदाज वर्तवला आहे. येत्या दोन-तीन दिवसांत वेस्टर्न डिस्टर्बन्स, पाऊस किंवा वादळ आणि अरबी समुद्राकडून वायव्य भारताकडे वाहणारे नैऋत्य वारे यामुळे तापमानात घट झाली आहे. त्यामुळे लोकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण उत्तर-पश्चिम भारतात उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे. यंदा राजस्थानच्या चुरूमध्ये कमाल तापमान 50 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. भारतात अनेक ठिकाणी तापमान ५० अंशाच्या जवळ पोहोचले आहे.

केरळ नंतर मान्सून इतर राज्यांमध्ये कधी पोहोचेल जाणून घ्या.

केरळ- 30 मे

तामिळनाडू- 1 ते 5 जून

आंध्र प्रदेश- 4 ते 11 जून

कर्नाटक- 3 ते 8 जून

महाराष्ट्र- 9 ते 16 जून

गोवा- 5 जून-10 जून

ओडिशा- 11 ते 16 जून

उत्तरप्रदेश- 18 ते 2 जून

उत्तराखंड- 20 ते 25 जून

हिमाचल प्रदेश- 22 ते 23 जून

जम्मू-काश्मीर- 22 ते 29 जून

दिल्ली- 27-28 जून

बिहार- 13 ते 18 जून

झारखंड- 13 ते 17 जून

पश्चिम बंगाल- 7 ते 13 जून

छत्तीसगड- 13 ते 17 जून

गुजरात- 19 ते 30 जून

मध्य प्रदेश- 16 ते 21 जून

पंजाब- 26 जून ते 1 जुलै

हरियाणा- 27 जून ते 3 जुलै

राजस्थान- 25 जून ते 6 जुलै

भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे की, पुढील २४ तासांत तामिळनाडू आणि केरळमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.