माफीनाम्यानंतर आता एकीचा नारा, पण दोन्ही पक्षात अलबेल तरी कुठे आहे हो…

| Updated on: Sep 29, 2022 | 10:18 PM

सचिन पायलट यांनी आपले म्हणणे सोनिया गांधी यांच्यासमोर ठेवले असून पक्षाध्यक्षांनीही त्यांची बाजू ऐकून घेतली असून उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे.

माफीनाम्यानंतर आता एकीचा नारा, पण दोन्ही पक्षात अलबेल तरी कुठे आहे हो...
Follow us on

नवी दिल्लीः काँग्रेस अध्यक्ष पदावरुन राजस्थान काँग्रेसमध्ये (Rajsthan Congress) झालेल्या अनेक घटनांमुळे दिल्लीतील राजकीय हालचालींना वेग आला आहे. राजस्थानमधील काँग्रेसची गटबाजीही यामुळे समोर आली आहे. त्यादरम्यान, राजस्थान सरकारचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट (Sachin Pilot) यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांचीही भेट घेतली आहे. ही ही भेट सुमारे तासभर चालली होती. सोनिया गांधी यांची भेट झाल्यानंतर सचिन पायलट म्हणाले की, राजस्थानच्या मुद्यांवर दोघांमध्ये दीर्घकाळ चर्चा झाली आहे.

सचिन पायलट यांनी आपले म्हणणे सोनिया गांधी यांच्यासमोर ठेवले असून पक्षाध्यक्षांनीही त्यांची बाजू ऐकून घेतली आहे.

त्यानंतर सचिन पायलट यांनी सांगितले की, राजस्थान निवडणूक जिंकणे ही त्यांचे पहिले लक्ष्य आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा जोमाने आणि एकत्र काम करावे लागेल असंही त्यांनी सांगितले.

सोनिया गांधी आणि सचिन पायलट यांच्यामध्ये चर्चा झाली असली तरी मुख्यमंत्रीपदाबाबत मात्र अजून कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

त्यामुळे पक्षाकडूनही कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. तसेच सचिन पायलट यांनी भेट घेण्यापूर्वी सीएम अशोक गेहलोत यांनीही सोनिया गांधी यांची भेट घेतली होती.

गेहलोत यांनी सोनिया गांधी यांच्यासमोर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची ऑफर दिल्याचे सांगण्यात येत आहे. तर त्याचवेळी जयपूरमध्ये रविवारी घडलेल्या घडामोडींनंतर सचिन पायलट यांची हायकमांड यांच्याबरोबरची ही पहिलीच भेट होती.

त्याचवेळी, के. सी. वेणुगोपाल यांच्याकडूनही स्पष्ट करण्यात आले आहे की, सोनिया गांधी येत्या एक-दोन दिवसांत मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेऊ शकतात असंही त्यांनी सांगितले.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सुमारे दीड तास चर्चा केली होती. त्यांच्या या बैठकीनंतर त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठीची आपण निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले होते.

इतकंच नाही तर राजस्थानमध्ये जे घडलं त्यामुळे आपण खूप दु:खी असून त्यामुळे आपण दुखावलो असल्याचेही त्यांनी सांगितले. तर चर्चा झाल्यानंतर त्यांनी सोनिया गांधीची माफीही मागितली आहे.

राजस्थानचा मुख्यमंत्री कोण होणार याचा सर्वस्वी अधिकार सोनिया गांधी घेतील असं मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सांगितले आहे. बैठकीनंतर त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढविणार नसल्याचेही जाहीर केले आहे.