AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ram madir : राम मंदिराच्या गर्भगृहात दिसले अद्भूत दृष्य, भाविक म्हणू लागले चमत्कार

Ram mandir : अयोध्येतील राम मंदिरात भाविकांनी आणखी एक चमत्कार पाहिल्याचा दावा केला आहे. राम मंदिर सर्वांसाठी खुले झाल्यानंतर आतापर्यंत लाखो लोकांनी रामलल्लाचे दर्शन घेतले आहे. भक्तांकडून भरभरुन दान दिले जात आहे. त्यातच आता आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्याला पाहून लोकं चमत्कार म्हणत आहेत.

Ram madir : राम मंदिराच्या गर्भगृहात दिसले अद्भूत दृष्य, भाविक म्हणू लागले चमत्कार
| Updated on: Feb 29, 2024 | 2:41 PM
Share

Ram mandir : 22 जानेवारी रोजी अयोध्येतील भव्य मंदिराचे उद्घाटन झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले झाले आहे. भव्य मंदिरात रामलल्ला विराजमान झाल्यानंतर लाखो भाविक दर्शनासाठी येत आहेत. भगवान श्रीरामल्ला विराजमान झाल्यानंतर अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. जे चमत्कार असल्याचं भाविक सांगत आहेत. काही दिवसांपूर्वीच एक माकड या मंदिरात शिरले होते. त्यानंतर गाभाऱ्यात हे माकड जाऊन आल्यानंतर कोणाला ही त्रास न देता निघून देखील गेले.

मूर्तीचा हावभाव देखील बदलला

रामलल्लाची मूर्ती बनवणारे शिल्पकार अरुण योगीराज यांनी सांगितले की मी बनवलेली मूर्ती गर्भगृहाच्या आत गेल्यावर तिचे भाव बदलले आणि डोळे देखील बोलू लागले आहेत. अरुण योगी राज यांनी सांगितले की, गाभाऱ्याच्या बाहेर मूर्तीची प्रतिमा वेगळी होती, परंतु जेव्हा मूर्ती गर्भगृहात प्रवेश करण्यात आली तेव्हा तिची आभा बदलली. मलाही ते जाणवलं.

ते म्हणाले की, मी गर्भगृहात माझ्यासोबत उपस्थित असलेल्या लोकांनाही सांगितले होते की हा दैवी चमत्कार आहे की आणखी काही, परंतु मूर्तीमध्ये बदल झाला आहे. आता राम मंदिरात असं काही घडलं ज्याला लोक चमत्कार म्हणत आहेत. कारण एक पक्षी राम मंदिराच्या गर्भगृहात पोहोचला आणि रामलल्लाच्या मूर्तीला प्रदक्षिणा घालू लागला.

गरुड पक्षीकडून मूर्तीला प्रदक्षिणा

मंदिराच्या गर्भगृहात आलेला हा पक्षी दुसरा कोणी नसून पक्षाचा राजा गरुड होता. जो आपल्या भगवान श्री रामाच्या दर्शनासाठी आला होता. लोकांनी हे दृश्य आपल्या मोबाईलमध्ये कैद केले. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हा व्हिडिओ भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. गरुड देव भगवान श्री रामललाच्या गर्भगृहाला प्रदक्षिणा घालत असल्याचे व्हिडिओत म्हटले आहे.

भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?.
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक.
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद.
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले.
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता.
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी.
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे.
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन.