AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

G20 च्या भारत मंडपममध्ये RBI ने बनवला सर्वात आकर्षक मंच, जगासमोर ठेवणार e-RUPI चा पर्याय

G20 देशांच्या जागतिक नेत्यांच्या स्वागतासाठी दिल्ली सज्ज आहे. यादरम्यान भारत कोणतीच कसर सोडणार नाही. जी संधी मिळेल तिथे भारतीय उत्पादनांना प्रमोट करणार आहे.

G20 च्या भारत मंडपममध्ये RBI ने बनवला सर्वात आकर्षक मंच, जगासमोर ठेवणार e-RUPI चा पर्याय
| Updated on: Sep 07, 2023 | 12:41 AM
Share

G20 India : G20 देशांच्या जागतिक नेत्यांच्या स्वागतासाठी दिल्ली पूर्णपणे सज्ज आहे. हॉटेल बुक करण्यापासून ते नेपाळमधून आलिशान वाहने आयात करण्यापर्यंतची कामे पूर्ण झाली आहेत. सुरक्षेसाठी प्रत्येक कानाकोपऱ्यावर पाळत ठेवण्यात आली असून दिल्लीला छावणीचे स्वरूप आले आहे. प्रगती मैदानातील ‘भारत मंडपम’ मुख्य कार्यक्रमासाठी पूर्णपणे सज्ज आहे आणि येथील सर्वात अनोखे दृश्य ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ (RBI) चे मंडप असेल.

खर्‍या अर्थाने पाहिले तर G20 हे आर्थिक धोरणे आणि उद्दिष्टे ठरवण्यासाठी एक उत्तम मंच आहे. अशा परिस्थितीत RBI व्यतिरिक्त भारताच्या आर्थिक शक्तीचा सर्वात मजबूत संदेशवाहक कोण असू शकतो. त्यामुळे आरबीआयचा मंडप वेगळा आणि प्रेक्षणीय असेल.

ई-रुपी वर लक्ष केंद्रित केले जाईल

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पॅव्हेलियनचे मुख्य लक्ष भारताच्या अधिकृत डिजिटल चलन ‘ई-RUPI’ वर असेल. हे मंडपाचे प्रमुख आकर्षण असेल. रिझव्‍‌र्ह बँकेने यंदा हे डिजिटल चलन सुरू केले आहे. सध्या त्याची चाचणी सुरू आहे आणि लवकरच ते देशाला कॅशलेस इकॉनॉमी बनवण्यासाठी एक मोठे साधन बनणार आहे.

Rbi G20 India

क्रिप्टोकरन्सीसारख्या समस्यांशी झगडत असलेल्या जगासमोर भारताला ई-RUPI एक उदाहरण म्हणून सादर करायचे आहे. रिझर्व्ह बँकेनेच विक्रमी वेळेत तयारी करून अनोखा विक्रम केला आहे. अशा स्थितीत जगातील 20 बलाढ्य देशांचे नेते भारतात एकत्र येत असताना भारताच्या आर्थिक आणि तांत्रिक सामर्थ्याचे प्रतीक असलेल्या ई-रुपीला दाखवण्याची संधी कशी चुकणार? याआधी जगातील अनेक देशांनी डिजिटल व्यवहारांसाठी भारताचे UPI तंत्रज्ञान स्वीकारले आहे.

Rbi G20 India Three

G20 शिखर परिषदेत भारताचा अजेंडा

G20 च्या अध्यक्षपदासह भारत देखील आपला अजेंडा पुढे नेत आहे. यामध्ये जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसारख्या जागतिक संस्थांमध्ये सुधारणा करण्याची बाब सर्वात महत्त्वाची आहे. यासोबतच भारताने जवळपास प्रत्येक प्लॅटफॉर्मवर क्रिप्टोकरन्सीच्या समस्येला तोंड देण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहमती निर्माण करण्याबाबत वक्तव्य केले आहे. या अर्थाने, डिजिटल व्यवहारांमध्ये भारताचे यश जगासमोर दाखवण्याची ही एक उत्तम संधी आहे.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.