पावसाने शेतात अचानक खड्डा पडला, अन् २ हजार वर्षांपूर्वीच्या संस्कृतीचे दालन उघडले, बुद्धमुर्त्यांचे अवशेषही सापडले

उत्तर प्रदेशातील रायबरेलीत प्राचीन मातीची भांडी आणि खेळणी देखील सापडली असून ती कुशाणकालीन आहेत. बुधवारी दिवसभर सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून, त्याचा अहवाल पुरातत्व विभागाला सादर केला जाणार आहे.

पावसाने शेतात अचानक खड्डा पडला, अन् २ हजार वर्षांपूर्वीच्या संस्कृतीचे दालन उघडले, बुद्धमुर्त्यांचे अवशेषही सापडले
remnants of Buddha statues
| Updated on: Jul 31, 2026 | 11:01 PM

उत्तर प्रदेशातील रायबरेलीत एका शेतकऱ्याच्या शेतात अचानक जमीन धसल्याने १५ ते २० फूट खड्डा पडला. त्यानंतर येथे एक पुरातन संस्कृतीचे अवशेष समोर आले आहेत. ही माहिती मिळताच या घटनास्थळावर लखनऊ येथून पुरातत्व तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. संशोधकांनी या जागेचे खोदकाम केले तर त्यांना तेथे मौल्यवान वस्तूंचा खजानाच सापडला आहे. त्यामुळे पुरातत्व खात्याचे अधिकारी देखील हैराण झाले आहेत. या जागेतून भगवान बुद्ध आणि त्यांची आई महामाया यांच्या प्राचीन मुर्ती आणि नाणी देखील सापडली आहेत.

हरचंदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओई गावातील शेतकरी सुशील मौर्य यांच्या शेतात अचानक झालेल्या पावसाने जमीन खचली. माती खाली गेल्यानंतर आत प्राचीन विटांच्या बांधकामाच्या भिंती दिसल्याने मौर्य आश्चर्यचकीत झाले. ही बातमी जिल्हा प्रशासनाला मिळाली. त्यानंतर लखनऊ येथून संशोधक येथे पाहाणी साठी आले. त्यांनी संपूर्ण जागेची पाहणी करुन आपला अहवाल सरकारला पाठवला आहे.

ओई गावात दोन हजार वर्षांपूर्वी दफन झालेला इतिहास सापडला आहे.बुधवारी लखनऊ येथून राज्य पुरातत्व विभागाच्या पथकाने हा खुलासा केला आहे. पुरातत्व पथकाने दिवसभर टेकडीवरील खड्ड्यात खोदकाम केले आणि बोगद्यासारख्या रचनेची बारकाईने पाहणी केली. येथे पथकाला एक दोन हजार वर्षांपूर्वीची भिंत सापडली आहे. ही भिंत कुशाण काळातील असल्याचा दावा पुरातत्व विभागाच्या पथकाने केला आहे. या संदर्भात आता दावा करणे घाईचे ठरेल परंतू हे बांधकाम प्रथमदर्शनी दोन हजार वर्षे जुने असून कुशाण काळातील आहे असे सहायक पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ. मनोज कुमार यादव यांनी म्हटले आहे.

भूमिगत मातीची भांडी सापडली…

या टेकडीचे सर्वेक्षण १९६७-६८ मध्ये देखील करण्यात आले होते. त्यावेळी कोणतीही अधिसूचना जारी केली नव्हती. येथे शेतकरी या जमिनीची मशागत करत आहेत आणि तर दुसरीकडे, जिथे प्राचीन संस्कृती अस्तित्वात आहे, तिथे एक फुटापेक्षा जास्त जमीन खोदता येत नाही अशी येथील सर्वात मोठी समस्या आहे. टेकडीच्या कडेला अतिक्रमणही झालेले आहे. याचा सविस्तर अहवाल तयार करून सरकारला पाठवला जाणार आहे. त्यानंतर पुढील कारवाई होणार असल्याचे म्हटले जात आहे.

भगवान बुद्ध आणि त्यांची आई महामाया यांच्या भग्न मूर्ती सापडल्या

मंगळवारी सकाळी, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) विभागाचे अधिकारी डॉ. राजेंद्र यादव यांनी शेतकऱ्याच्या शेतातील खड्ड्याची पाहणी केली. त्यांनी राज्य पुरातत्व विभागाला या मलब्याची तपासणी करण्याची शिफारस केली. यानंतर, बुधवारी, राज्य पुरातत्व विभागाचे सहायक पुरातत्व अधिकारी डॉ. मनोज कुमार यादव, त्यांचे सहायक हिमांशू सिंग यांच्यासह शेतकऱ्याच्या शेतात पोहोचले . सहायक पुरातत्व अधिकारी शिडीच्या साहाय्याने या खड्ड्यात उतरले. त्यांनी खड्ड्याच्या आतील आणि लगतच्या भिंतींचे निरीक्षण केले. त्यांनी भिंतीच्या प्राचीन विटा मोजल्या. खड्ड्यात सापडलेल्या मातीच्या मशालीची आणि भांड्याची पाहणी केली. शेतकरी अशोक प्रताप मौर्य यांनी ढिगाऱ्यात सापडलेल्या भगवान बुद्ध आणि त्यांची आई महामाया यांच्या भग्न मूर्ती देखील पथकाला दाखवल्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us