Ram Temple : मोठी बातमी! निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा राम मंदिराचे नवे सीईओ

मोठी बातमी! निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा राम मंदिराचे नवे सीईओ

Ram Temple : मोठी बातमी! निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा राम मंदिराचे नवे सीईओ
Jitendra Mishra elected as new CEO of ayodhya Ram Mandir temple
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 02, 2026 | 5:14 PM

Ayodhya Ram Temple Trust New CEO : अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराशी संबंधित महत्त्वाची जबाबदारी आता भारतीय हवाई दलातील अनुभवी अधिकाऱ्याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे त्यांच्या लष्करी कारकिर्दीबरोबरच नव्या जबाबदारीचीही चर्चा सुरू झाली आहे.

जितेंद्र मिश्रा हे भारतीय हवाई दलातील अत्यंत अनुभवी अधिकारी म्हणून आहेत. ते 30 एप्रिल 2026 रोजी एअर मार्शल पदावरून निवृत्त झाले. आपल्या जवळपास चार दशकांच्या लष्करी सेवेत त्यांनी विविध महत्त्वाच्या कमांड आणि प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.

कारगिल युद्धात महत्त्वाची भूमिका

जितेंद्र मिश्रा यांच्या लष्करी कारकिर्दीतील अनेक मोहिमा विशेष ठरल्या. 1999च्या कारगील युद्धादरम्यान टायगर हिलवरील कारवाईत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. याशिवाय 2025 मध्ये झालेल्या ऑपरेशन सिंदूरदरम्यान वेस्टर्न एअर कमांडचे नेतृत्व करण्याची जबाबदारीही त्यांनी सांभाळली. ऑपरेशन सिंदूरमधील त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना 2025च्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सर्वोत्तम युद्ध सेवा पदकाने (YSM) सन्मानित करण्यात आले.

39 वर्षांचा प्रदीर्घ लष्करी प्रवास

उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील बनकटा येथील रहिवासी असलेले जितेंद्र मिश्रा डिसेंबर 1986 मध्ये भारतीय हवाई दलाच्या फायटर स्ट्रीममध्ये दाखल झाले. त्यानंतर जवळपास 39 वर्षांच्या सेवेत त्यांनी विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले. फायटर पायलटपासून टेस्ट पायलटपर्यंत तसेच प्रशिक्षण, ऑपरेशनल प्लॅनिंग आणि रणनीतिक नियोजन अशा विविध क्षेत्रांत त्यांनी काम केले आहे. त्यांच्या नावावर 3,000 तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव आहे. विशेष म्हणजे त्यांनी फायटर जेट, ट्रान्सपोर्ट विमान आणि हेलिकॉप्टर अशा 18हून अधिक प्रकारच्या विमानांचे उड्डाण केले आहे.

अनेक प्रतिष्ठेचे लष्करी पुरस्कार

लष्करी सेवेत उल्लेखनीय योगदानाबद्दल जितेंद्र मिश्रा यांना अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले आहेत. 2024 मध्ये त्यांना अति विशिष्ट सेवा पदक (AVSM) प्रदान करण्यात आले. त्यापूर्वी 2013 मध्ये विशिष्ट सेवा पदक (VSM) देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता. दरम्यान, राम मंदिरातील देणगीत झालेल्या कथित गैव्यवहाराचा मुद्दा अजूनही  मागे पडलेला नाही. असे असताना आता जितेंद्र मिश्रा हे राम मंदीर ट्रस्टचे सीईओपद सांभाळणार आहेत. त्यामुळे त्यांच्या कारकिर्दीते काय काय होणार? ते ही जबाबदारी नेमकी कशी पार पाडणार? हे महत्त्वाचे ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us