Rich People List 2026: मुकेश अंबानी नाही तर देशाचा सर्वांत श्रीमंत व्यक्ती कोण? कितव्या क्रमांकावर घसरण
Rich People List 2026: भारतातील श्रीमंत व्यक्तींची चर्चा सुरु असेल तर, सर्वात पहिलं नाव मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांचं येतं. पण आता देशातील अब्ंजाधीशांची यादी समोर आली आहे. तर जाणून घ्या मुकेश अंबानी नाही तर, देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे. कितव्या क्रमांकावर त्यांची घसरण झाली?

Rich People List 2026: भारतातील श्रीमंतांची संख्या आता वाढत आहे. भारतातील श्रीमंत उद्योजकांची चर्चा सुरु झाली तर, सर्वात पहिलं नाव मुकेश अंबानी, गौतम अदानी यांसारख्या उद्योजकांचं असतं. पण आदा दोघांमध्ये सर्वात श्रीमंत व्यक्ती कोणी आहे याची यादी समोर आली आहे, त्यासोबत अन्य श्रीमंत उद्योजकांची यादी देखील समोर आली आहे. ज्यामध्ये भारतातील टॉप 27 उद्योजकांचं नाव सामिल आहे. ‘M3M हुरुन इंडिया रिच लिस्ट 2026’ नुसार, गौतम अदानी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावलं आहे. या यादीनुसार, अदानी कुटुंबाची एकूण संपत्ती अंदाजे 9.23 लाख कोटी रुपये इतकी आहे.
अंबानी कुटुंबाला मागे टाकत अदानी पुढे
गेल्या वर्षीचा ‘M3M हुरुन इंडिया रिच लिस्ट 2026’ नुसार, मुकेश अंबानी आणि त्यांचं कुटुंब सर्वात पहिल्या क्रमांकावर आहे. यंदाच्या वर्षी मात्र अंबानी कुटुंबियांच्या संपत्तीत घट झाली आहे. या वर्षी अंबानी कुटुंबाची संपत्ती कमी होऊन ती अंदाजे 8.63 लाख कोटींवर आली. याउलट, आदानी कुटुंबाच्या संपत्तीत मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे 13 टक्क्यांनी वाढ झाली.
टॉप 10 अब्जाधीशांची लिस्ट
गौतम अदानी आणि कुटुंब
मुकेश अदानी आणि कुटुंब
एलएन मित्तन आणि कुटुंब
सायरस पूनावाला आणि कुटुंब
रोशनी नाडर मल्होत्रा आणि कुटुंब
कुमार मंगलम बिर्ला आणि कुटुंब
दिलीप सांघवी आणि कुटुंब
अजीम प्रेमजी आणि कुटुंब
अनिल अग्रवाल आणि कुटुंब
समीर मेहता आणि कुटुंब
देशात अब्जाधीशांच्या संख्येत वाढ
समोर आलेल्या रिपोर्टनुसार, भारतात आता 1 अब्ज डॉलर्स म्हणजे भारतील चलनानुसार सुमारे 8 हजार कोटी रुपये अधिक संपत्ती असलेले 391 अब्जाधीश आहेत. गेल्या वर्षभरात या अब्जाधीशांच्या यादीत 27 नवीन नावांची भर पडली आहे. पाच वर्षांपूर्वी भारतात 237 ‘डॉलर अब्जाधीश’ होते; यावरून या काळात त्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येतं.
कशी वाढली संपत्ती…
या रिपोर्टमध्ये असंही नमूद केलं आहे की, केवळ पारंपरिक व्यवसायांमधूनच नव्हे, तर आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI), डेटा सेंटर्स, सेमीकंडक्टर्स, संरक्षण आणि हरित ऊर्जा यांसारख्या क्षेत्रांतूनही आता मोठ्या प्रमाणावर संपत्ती निर्माण होत आहे. या वर्षीच्या यादीत आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) संबंधित 19 व्यक्तींचा समावेश करण्यात आला असून, त्यापैकी 15 जण पहिल्यांदाच या यादीत स्थान मिळवत आहेत. याव्यतिरिक्त, संरक्षण, एरोस्पेस आणि सेमीकंडक्टर्स यांसारख्या क्षेत्रांमधील श्रीमंत उद्योजकांच्या संख्येतही वेगाने वाढ झाली आहे.