बहिणीच्या फार्म हाऊसवर तेजस्वी यादव यांनी घेतले सातफेरे; हवाईसुंदरी असलेल्या सूनेवर लालू नाराज का?

| Updated on: Dec 09, 2021 | 6:04 PM

राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजस्वी यादव यांचा विवाह आज संपन्न झाला. हवाई सुंदरी असलेल्या अ‍ॅलेक्सिसशी त्यांनी सात फेरे घेतले.

बहिणीच्या फार्म हाऊसवर तेजस्वी यादव यांनी घेतले सातफेरे; हवाईसुंदरी असलेल्या सूनेवर लालू नाराज का?
tejashwi yadav married
Follow us on

लखनऊ: राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजस्वी यादव यांचा विवाह आज संपन्न झाला. हवाई सुंदरी असलेल्या अ‍ॅलेक्सिसशी त्यांनी सात फेरे घेतले. बहीण मिसा भारतीच्या फार्महाऊसवर मोजक्याच आप्तेष्टांच्या उपस्थित हा विवाह सोहळा पार पडला.

अ‍ॅलेक्सिस आणि तेजस्वी यादव गेल्या सहा वर्षापासून एकमेकांना ओळखतात. आज अखेर त्यांनी विवाह केला. तेजस्वी यांना लग्नासाठी दोन महिन्याचा ब्रेक हवा होता. मात्र, सााखरपुड्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी लग्न केलं. त्यांच्या साखरपुडा आणि लग्नाचा कार्यक्रम बहीण मिसाच्या फार्म हाऊसवरच पार पडला. यावेळी लग्न सोहळ्याला येणाऱ्या प्रत्येक वाहनांची कसून तपासणी केली जात होती. या लग्न सोहळ्यासाठी थ्री लेअर सेक्युरिटी तैनात करण्यात आली होती. मीडियाला लग्न समारंभाच्या स्थळीही येण्यास मज्जाव करण्यात आला होता.

फोटो व्हायरल

तेजस्वीच्या लग्नाची थीम पिंक आणि ब्लू होती. गेटवर सफेद, गुलाबी फुलांची सजावट करण्यात आली होती. स्टेजची सजावटही भव्य करण्यात आली होती. तेजस्वी आणि अ‍ॅलेक्सिसच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले आहेत. अ‍ॅलेक्सिसने लाल साडी परिधान केली आहे. तर तेजस्वी यादव यांनी गोल्डन शेरवानी परिधान केली आहे.

अ‍ॅलेक्सिस काय करते?

अ‍ॅलेक्सिस ही दिल्लीच्या वसंत विहारची राहणारी आहे. ती पूर्वी एअरहोस्टेस होती. तिचे वडील चंदीगडच्या एका शाळेत प्रिन्सिपल होते. तेजस्वी आणि अ‍ॅलेक्सिस एकमेकांना गेल्या सहा वर्षापासून डेट करत होते.

लालूंचा विरोध

तेजस्वीने अ‍ॅलेक्सिशी विवाह केला. पण या लग्नावर लालूप्रसाद यादव नाराज होते. अ‍ॅलेक्सिस ख्रिश्चन असल्याने लालू या लग्नावर नाराज असल्याचं सांगितलं जातं. मात्र, मुलाच्या प्रेमापुढे त्यांना माघार घ्यावी लागली. लालू प्रसाद यादव यांनी तेजस्वी यांना आपला राजकीय वारसदार घोषित केलेलं आहे. त्यामुळेही त्यांना मुलापुढे झुकावं लागल्याचं सांगितलं जातं.

 

संबंधित बातम्या:

Ashish Shelar : आशिष शेलार यांना 1 लाखाचा ऑनटेबल जामीन मंजूर, गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव

Farmer Protest : मोदी सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने ‘जुमला’ ठरु नयेत, आश्वासनांची पूर्तता लवकर करा, पटोलेंची मागणी

Video : सीडीएस जनरल बिपिन रावत आणि अन्य सैन्य अधिकाऱ्यांच्या पार्थिवाला तामिळनाडूत भावूक निरोप, जनतेकडून शववाहिकेवर पुष्पवृष्टी