Mohan Bhagwat : सरसंघचालक मोहन भागवत यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त PM मोदींनी लिहिला खास लेख, ‘सौभाग्य आहे आमचं…’

"संघ परिवारात ज्यांना परम पूजनीय सरसंघचालक म्हणून श्रद्धाभावनेने संबोधित केलं जातं, अशा आदरणीय मोहन भागवत जी यांचा आज जन्मदिवस आहे. हा एक सुखद संयोग आहे, याचवर्षी संघ आपलं शताब्दी वर्ष साजरं करत आहे" असं पीएम मोदींनी म्हटलय.

Mohan Bhagwat : सरसंघचालक मोहन भागवत यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त PM मोदींनी लिहिला खास लेख, सौभाग्य आहे आमचं...
Mohan Bhagwat-Narendra Modi
| Updated on: Sep 11, 2025 | 11:00 AM

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत आज 75 वर्षांचे झालेत. वाढदिवसाच्या निमित्ताने देशातील अनेक नेते त्यांना शुभेच्छा देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोहन भागवतांना शुभेच्छा संदेश देताना एक मेसेज लिहिला आहे. सोबतच त्यांनी एक लेख सुद्धा लिहिला आहे. मोदींनी आपल्या लेखात लिहिलय की, ‘मोहन भागवत एक असामान्य व्यक्ती आहेत. त्यांच्यासाठी देश सर्वोपरि आहे’ पीएम मोदींनी लिहिलय की, “मोहनजींच्या कुटुंबासोबत जुने संबंध आहेत. वसुधैव कुटुम्बकम या सिद्धांतापासून प्रेरणा घेऊन मोहन भागवत यांनी आपलं संपूर्ण जीवन सामाजिक परिवर्तन, सद्भाव आणि बंधुत्वाची भावना सुदृढ करण्यासाठी समर्पित केलय” ‘देशसेवेसाठी त्यांना दीर्घायुष लाभो आणि त्यांच्या स्वस्थ जीवनासाठी प्रार्थना करतो’ असं मोदींनी लेखात म्हटलय.

“आज 11 सप्टेंबर आहे. हा दिवस वेगवेगळ्या स्मृतींशी जोडलेला आहे. एक आठवण 1893 ची आहे. त्यावर्षी स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथे जागतिक बंधुत्वाचा संदेश दिलेला. दुसरी आठवण आहे, 9/11 दहशतवादी हल्ल्याची. यामुळे विश्व बंधुत्वाच सर्वात जास्त नुकसान झालेलं. आजच्या दिवसाची आणखी एक विशेष बाब आहे, आज एक अशा व्यक्तीचा 75 वा वाढदिवस आहे, ज्यांनी वसुधैव कुटुंबकम या मंत्रावर चालत समाजाला संघटित करणं, समता-समरसता आणि बंधुत्वाची भावना सशक्त करण्यासाठी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं” असं पीएम मोदी यांनी लिहिलं आहे.

हा एक सुखद संयोग

“संघ परिवारात ज्यांना परम पूजनीय सरसंघचालक म्हणून श्रद्धाभावनेने संबोधित केलं जातं, अशा आदरणीय मोहन भागवत जी यांचा आज जन्मदिवस आहे. हा एक सुखद संयोग आहे, याचवर्षी संघ आपलं शताब्दी वर्ष साजरं करत आहे. मी भागवत यांनी हार्दिक शुभेच्छा देतो व प्रार्थना करतो की, ईश्वर त्यांना दीर्घायु आणि उत्तम स्वास्थ्य देवो” असं पीएम मोदींनी लिहिलय.


मोहनरावांच्या रुपात त्यांनी आणखी एक पारसमणी तयार केला

“मोहन भागवत यांच्या कुटुंबासोबत माझे घनिष्ठ संबंध आहेत. मला त्यांचे वडील, स्वर्गीय मधुकरराव भागवत यांच्यासोबत काम करण्याचं सौभाग्य लाभलं. मी माझं पुस्तक ज्योतिपुंजमध्ये मधुकरराव यांच्याबद्दल विस्ताराने लिहिलय. वकिली संभाळताना मधुकरराव जीवन भर राष्ट्र निर्माणाच्या कार्याला समर्पित राहिले. आपल्या युवावस्थेत त्यांनी बराच काळ गुजरातध्ये घालवला. संघ कार्याचा मजबूत पाया रचला.मधुकरराव यांचा राष्ट्र निर्माणाकडे कल इतका प्रबळ होता की, त्यांनी आपले पुत्र मोहनराव यांना सुद्धा या महान कार्यामध्ये आणलं. मधुकरराव स्वत:एक पारसमणी होते. मोहनरावांच्या रुपात त्यांनी आणखी एक पारसमणी तयार केला” असं पीएम मोदींनी लिहिलय. स्वयंसेवकांच सौभाग्य आहे की, त्यांच्याकडे मोहन भागवत यांच्यासारखा सरसंघचालक आहे असं पीएम मोदींनी म्हटलय.