
“समाजाने जातीय भेदभाव मागे सोडून एका समरस सर्वसमावेशक राष्ट्राच्या दिशेने अग्रेसर झालं पाहिजे. संघाच कार्य व्यक्ती निर्माणाच आहे. व्यक्ती निर्माणातून कुटुंब, समाज, राष्ट्र आणि संपूर्ण मानवतेप्रती उत्तदायित्वाची भावना जागृत होते” असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत रविवार स्वयंसेवकांशी संवाद साधताना म्हणाले. मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांकडून त्यांच्या भागात सुरु असलेल्या शाखा आणि सेवा कार्याची माहिती घेतली. “ज्या भागात शाखा आहे, त्या भागातील प्रत्येक कुटुंबाशी संघाचा संपर्क असला पाहिजे” असं मोहन भागवत म्हणाले. “आपण ‘वसुधैव कुटुम्बकम्’- विश्व एक परिवार आहे असं म्हणतो, याच भावनेतून संघाने आपल्या कार्याचा विस्तार समाज जीवनच्या विभिन्न क्षेत्रात केला आहे” असं मोहन भागवत म्हणाले.
“देशभरात लाखो सेवा कार्य संघ कार्यकर्ते आणि समाजाच्या सहकार्याने सुरु आहेत. जे समाजातील सकारात्मक परिवर्तनाच उदहारण आहे. वर्तमानात संघाने शताब्दी वर्षात प्रवेश केला आहे. ‘पंच परिवर्तना’च्या सिद्धांतावर कार्य करताना समाजाला जागरूक, उत्तरदायी आणि संवेदनशील बनवण्याच्या दिशेने अग्रेसर आहे” असं सरसंघचालकांनी सांगितलं.
जातीय विषमतेपासून मुक्त व्हा
“राष्ट्राप्रती आपली जबाबदारी ओळखणारा समाजा असावा. पर्यावरणाला अनुकूल जीवन शैली स्वीकारली पाहिजे. जातीय विषमतेपासून मुक्त व्हा. मंदिर, जलाशय आणि स्मशान अशा सार्वजनिक स्त्रोतांवर संपूर्ण समजाचा अधिकार असला पाहिजे. हीच खरी सामाजिक समरसता आहे” असे विचार मोहन भागवत यांनी व्यक्त केले.