
Bomb In Plane : विमान प्रवासादरम्यान सर्व नियमांचे पालन करावे लागते. प्रवाशांसोबतच क्रू मेंबर्स आणि पायल यांनादेखील सर्व नियम काटेकोरपणे पाळावेच लागतात. विमानाचे टेकऑफ किंवा प्रवासादरम्यान एखादी चुक झाल्यास अनेकांच्या जीवाला धोको पोहोचू शकतो. याच कारणामुळे विमानाने उड्डाण करण्याआधी एखादी जरी चुक दिसून आली की नियमानुसार सर्व पडताळणी केली जाते. असे असूनही विमान अपघाताच्या घटना थांबताना दिसत नाहीत. असे असतानाच आता एका विमान थेट बॉम्बने उवडून देण्याची धमकी देण्यात आली. या धमकीमुळे विमानतळावर हायअलर्ट देण्यात आला. या घटनेनंतर सर्वच प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. ही घटना कोलकाता विमानतळावर घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कोलकाता विमानतळावर 6E3074 या इंडिगो कंपनीच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाली. सकाळी 9 वाजून 15 मिनिटांनी हे विमान कोलकाता येथील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावरून हे विमान शिलाँगच्या दिशेने उड्डाण करणार होते. परंतु उड्डाण करण्याआधीच या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाली. त्यानंतर विमानतळाच्या प्रशासनाने हे विमान तत्काळ आयसोलेशन झोनमध्ये नेले. विमान उड्डाण करणाच्या अगोदरच पायलटला टॉयलेटमध्ये विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर सर्व प्रवाशांना विमानातून खाली उतरवण्यात आले.
दुसरीकडे विमानात बॉम्ब असल्याचे समजताच विमानातील प्रवासी तसेच विमानतळात एकच खळबळ उडाली. तत्काळ विमान रिकामे करण्याचा आदेश देण्यात आला आणि विमानाची सगळी पडताळणी करावी लागली. सोबतच या काळात विमानतळाच्या परिसरात हायअलर्ट जारी करण्यात आला. नियमाप्रमाणे सर्व तपासणी केल्यानंतर विमानात कोणताही बॉम्ब नसल्याचे समोर आले. त्यानंतर साधारण 11 वाजून 30 मिनिटांनी विमान शिलाँगच्या दिशेने रवाना झाले.
दरम्यान, विमानाची सर्व तपासणी झाल्यानंतर बॉम्ब नसल्याचे समोर आले आहे. विमानाच्या टॉयलेटमध्ये बॉम्ब नेमका कोणी ठेवला? याची आता चौकशी केली जात आहे. नियमानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे.