
रशियाच्या समुद्र किनारी भागात शक्तिशाली भूकंप झाला. कमचटका द्वीपकल्पात झालेल्या या भूकंपाची नोंद 8.8 रिस्टल स्केल एवढी झाली आहे. रशिया भूकंपानं हादरलं आहे. भूकंपामध्ये केवळ मनुष्य आणि वित्तहानीच होत नाही तर काही अशा नैसर्गिक घटना घडतात ज्यामुळे भूगर्भीय रचना देखील बदलते. साप जमिनीमध्ये बीळात राहत असल्यामुळे त्यांना भूकंपाचे संकेत आधीच मिळतात. जगात भूकंपाच्या काही घटना अशा घडल्या आहेत, ज्यामध्ये भूकंप घडण्यापूर्वीच हजारो साप आपल्या बिळाबाहेर पडले आहेत.
भूकंप येण्यापूर्वी साप विशिष्ट प्रकारचे संकेत देतात, हे काही रिपोर्ट्स आणि वैज्ञानिक ऑब्जर्वेशनमधून देखील समोर आलं आहे. भूकंप होण्यापूर्वी काही मिनिट आधी साप आपल्या बिळांमधून बाहेर येतात, ते प्रचंड घाबरलेले असतात आणि इकडे तिकडे कुढेही दिशा मिळेल तिकडे धावत सुटतात. सामान्यपणे साप थंडीच्या काळात कधीच बाहेर पडत नाहीत, मात्र या काळात जर भूकंप होणार असेल तर साप बिळाच्या बाहेर पडतात.
सापांना आधीच कसं कळतं?
साप जमिनीच्या खाली बिळात राहातात, सापांची कंपन क्षमता ही पृथ्वीवर राहाणाऱ्या इतर कोणत्याही प्राण्यांपेक्षा अधिक असते. त्यामुळे भूकंपापूर्वी भूगर्भात जे विद्युत -चुंबकीय बदल होतात, त्याची सापांना लवकर जाणीव होते, त्यामुळे साप पृथ्वीच्या उदरातून बाहेर पडताता, एकाच वेळी हजारो साप देखील अशाप्रकारे बाहेर पडू शकतात.
जगात अशा काही भूकंपांची नोंद झाली आहे, ज्यामध्ये सापांनी अशाप्रकारचे संकेत दिले आहेत. 1920 मध्ये चीनच्या निगशिया प्रांतामधील हाइयुआनमध्ये भूकंप झाला होता, त्यावेळी देखील हजारो साप बिळाच्या बाहेर आले होते.चीनच्या टांगशान प्रांतामध्ये जेव्हा भूकंप झाला, तेव्हा देखील आदल्या दिवशी हजारो साप बिळाच्या बाहेर पडले होते, यावेळी तर हे साप अनेकांच्या घरात घुसले होते.2005 मध्ये गुजरातमध्ये देखील मोठा भूकंप आला, त्यावेळी देखील सापांनी असे संकेत दिल्याचं बोललं जातं. इंडोनेशियामध्ये देखील असाच प्रकार समोर आला होता, त्यावेळी एकाचवेळी शेकडो साप बिळाच्या बाहेर पडले होते.