AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

असं पहिल्यांदाच घडलंय… काँग्रेसचा नेता उपोषणाला, गांधीजी आहेत अन् हायकमांडचे फोटो गायब

पायलट यांच्या या इशाऱ्यानंतर काँग्रेसला मोठा झटका बसणार का, अशा चर्चा सध्या देशपातळीवर रंगल्या आहेत.

असं पहिल्यांदाच घडलंय... काँग्रेसचा नेता उपोषणाला, गांधीजी आहेत अन् हायकमांडचे फोटो गायब
Image Credit source: tv9 marathi
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Apr 11, 2023 | 12:47 PM
Share

जयपूर (राजस्थान): आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर प्रत्येक राज्यात भाजप (BJP) अत्यंत खबरदारीने डावपेच टाकतेय. मात्र अंतर्गत वादांनी पोखरल्या गेलेल्या काँग्रेसच्या मागचं शुक्लकाष्ठ संपायचं नाव घेत नाहीये. मोजक्याच राज्यात काँग्रेसची सत्ता आहे, मात्र त्यातील काही राज्यांमध्ये दुफळीचं चित्र आहे. राजस्थान काँग्रेसमधला दोन दिग्गज काँग्रेस नेत्यांमधला संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी अशोक गहलोत सरकारविरोधातच दंड थोपटले आहेत. यासोबतच राष्ट्रीय पातळीवरील हायकमांडलाही त्यांनी मोठा संदेश दिलाय. आज सकाळपासूनच सचिन पायलट जयपूर येथे उपोषणाला बसले असून आंदोलन स्थळी लावलेले बॅनर्स चर्चेत आहेत.

बॅनरवर महात्मा गांधी, हायकमांड गायब

सचिन पायलट यांनी आज सकाळी ११ वाजेपासून उपोषण आणि मौन आंदोलनाला सुरुवात केली आहे. आंदोलन स्थळी त्यांनी लावलेले पोस्टर सध्या चर्चेचा विषय़ ठरत आहे. काँग्रेसचा नेता उपोषणा बसलाय आणि बॅनरवरून हायकमांडचे फोटो गायब आहेत. पायलट यांच्या बॅनरवर फक्त महात्मा गांधीजी झळकत आहेत. राहुल गांधी, सोनिया गांधींसाठी हा मोठा इशारा आहे. तर सचिन पायलट यांच्यासाठीदेखील ही धोक्याची घंटा असू शकते. त्यामुळे देशभरात सध्या सचिन पायलट हे नाव ट्रेंड करतंय.

पायलट यांचं उपोषण कशासाठी?

राजस्थानमधील काँग्रेसचा युवा चेहरा सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यावर भाजप नेत्यांशी संगनमत केल्याचा आरोप केलाय. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना भ्रष्टाचारातून वाचविल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. राजस्थान सरकारने वसुंधरा राजे यांच्या काळातील भ्रष्टाचारावर कारवाई न केल्यास आपण एक दिवसीय उपोषण करणार असल्याचा इशारा पायलट यांनी दिला होता. त्यानुसार आज सचिन पायलट उपोषणाला बसले आहेत.

पायलट ‘आझाद’ होणार का?

पायलट यांच्या या इशाऱ्यानंतर काँग्रेसला मोठा झटका बसणार का, अशा चर्चा सध्या देशपातळीवर रंगल्या आहेत. गुलाम नबी आझाद यांच्याप्रमाणे सचिन पायलटदेखील काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार का, अशी चर्चा आहे. राजस्थानमध्ये येत्या सहा ते आठ महिन्यांत विधानसभा निवडणुका लागणार आहेत. त्यापूर्वी राजकीय घडामोडींना मोठा वेग आलाय. सचिन पायलट आणि अशोक गहलोत यांच्यातील शीतयुद्ध पहिल्यांदाच उफाळून आलंय असं नाही. यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकांनंतरही मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेवरून हा वाद उफाळला होता. गेल्या वर्षीही दोघांमधील धुसफूस हायकमांडपर्यंत पोहोचली होती. आता तर सचिन पायलट यांनी घेतलेल्या या निर्णयानंतर काँग्रेस हायकमांडकडून काय कारवाई केली जाते, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

Follow Us
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला...
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला....
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर...
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर....
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video.
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव...
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव....
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार.
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?.
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल.....
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल......
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ..
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ...
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार.
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको.