Sambhal : मशीद की, हरिहर मंदिर? आज सादर होणार सर्वे रिपोर्ट, संभलमध्ये हाय अलर्ट

Sambhal : मागच्या रविवारी जामा मशिदीच्या सर्वे दरम्यान हिंसाचार झाला होता. यामध्ये चार लोकांचा मृत्यू झाला होता. त्यांची ओळख पटवण्यात आली आहे. नईम, बिलाल, नोमान आणि कैफ अशी त्या चौघांची नाव आहेत. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत सात जणांविरोधात गुन्हा नोंदवून 31 जणांना अटक केली आहे.

Sambhal : मशीद की, हरिहर मंदिर? आज सादर होणार सर्वे रिपोर्ट, संभलमध्ये हाय अलर्ट
sambhal on high alert
| Updated on: Nov 29, 2024 | 9:07 AM

उत्तर प्रदेशच्या संभल जिल्ह्यात रविवारी शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान हिंसाचार झाला होता. पोलिसांनी शुक्रवारी नमाज अदा करण्याच्या एकदिवस आधी म्हणजे गुरुवारी मशिदीजवळ फ्लॅग मार्च केला. संभल शहरात जनजवीन हळूहळून पूर्वपदावर येत असल्याच पोलिसांनी सांगितलं. लोकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण व्हावी, यासाठी अपर पोलीस अधीक्षक श्रीश चंद्र यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी व्यस्त बाजारात फ्लॅग मार्च केला. रविवारच्या हिंसाचारानंतर संभलमध्ये बहुतांश दुकानं पहिल्यांदा उघडली. संभलमध्ये आता शांतता असून स्थिती सामान्य आहे, असं SSP ने सांगितलं. शुक्रवारच्या नमाजासाठी सुरक्षेची काय तयारी आहे? त्यावर ते म्हणाले की, “संभलमध्ये पुरेस पोलीस बळ तैनात केलं आहे. कुठल्याही स्थितीचा सामना करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत”

स्थानिक पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने नमाज पठणासंबंधी स्थानिक मुस्लिम धर्मगुरुंसोबत बैठक केली आहे, असं श्रीश चंद्र यांनी सांगितलं. संभलमध्ये आज नमाज अदा करण्यात येणार आहे. त्याचवेळी जामा मशिदी संबंधी सर्वेक्षण रिपोर्ट कोर्टात सादर करण्यात येईल. त्या संदर्भात मुस्लिम आणि हिंदू पक्षकारांनी आपली तयारी पूर्ण केली आहे. हिंदू पक्षाचे वकील श्रीगोपाल शर्मा म्हणाले की, “मुस्लिम पक्षाला उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर आम्ही प्रत्युत्तराची तयारी करु. मुस्लिम पक्षाने उत्तर दिल्यानंतरच आम्ही आमची पुढची रणनिती ठरवू”

मुस्लिम पक्षकाराच्या वकीलाने काय सांगितलं?

मुस्लिम पक्षकाराचे वकील शकील अहमद वारसी यांनी तयारी पूर्ण झाल्याच सांगितलं. “आमच्याकडे आमची बाजू सिद्ध करण्याचे सर्व पुरावे आहेत. आम्ही ते सर्व पुरावे न्यायालयात सादर करु” असं शकील अहमद वारसी म्हणाले. संभल हिंसाचारात मरण पावलेल्या चार लोकांच्या नातेवाईकांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवला आहे. एका जखमीवर मुरादाबाद येथे उपचार सुरु आहेत. त्याच्या नातेवाईकांनी मुरादाबादमध्ये तक्रार नोंदवलीय. मुरादाबादचे मंडलायुक्त आंजनेय कुमार सिंह यांनी ही माहिती दिली.

‘अल्लाहने अमन शांती कायम ठेवावी’

त्यांनी सांगितलं की, संभलमध्ये सर्व संवेदनशील ठिकाणी पोलीस तैनात आहेत. फक्त संभलच नाही, मुरादाबाद मंडलच्या सर्व पाच जिल्ह्यात सर्तकता आहे. संभलमध्ये मागच्या रविवारी झालेल्या हिंसाचारात किती नुकसान झालं? त्यावर नुकसानीचा आढावा घेण्याच काम अंतिम टप्प्यात असल्याच सांगितलं. संभलमध्ये लवकरच पहिल्यासारखी शांतता प्रस्थापित होईल, अशी अपेक्षा शाही जामा मशिदीचे इमाम आफताब हुसैन वारसी यांनी व्यक्त केली. “अल्लाहने अमन शांती कायम ठेवावी. लवकरच सर्व काही ठीक होईल अशी मला अपेक्षा आहे” असं आफताब हुसैन वारसी म्हणाले.