देवीच्या मंदिर परिसरात आढळली जीर्ण पेटी, आत जे होतं ते पाहून पोलिसांना फुटला घाम, फॉरेंसिक पथकाची पाचावर धारण, शहर हादरलं
एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, देवीच्या मंदिर परिसरात स्वच्छता सुरू असताना एक जीर्ण पेटी आढळून आली आहे. या पेटीमध्ये अशा काही वस्तू होत्या, त्यामुळे पोलिसांना देखील घाम फुटला आहे.

राजधानी दिल्लीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेमुळे सुरुवातीला मोठी खळबळ उडाली. दिल्लीमधील डीडीयू मार्ग परिसरामध्ये एमसीडीच्या एका स्वच्छता कर्मचाऱ्याला रस्ता झाडत असताना अशी एक वस्तू सापडली ज्यामुळे पोलिसांना चांगलाच घाम फुटला, तातडीने फॉरेंसिक पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आलं. मात्र समोरच दृष्य पाहून फॉरेंसिक पथकाला देखील मोठा धक्का बसला. डीडीयू मार्ग परिसरामध्ये स्वच्छता सुरू असताना एमसीडीच्या एका कर्मचाऱ्याला एक जुनी आणि जीर्ण झालेली पेटी आढळून आली. या घटनेची माहिती त्याने पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ही पेटी उघडल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला कारण या पेटीमध्ये अनेक मानवी कवट्या आढळून आल्या होत्या. या घटनेमुळे काही काळा मोठा गोंधळ उडाला. मात्र फॉरेंसिक लॅबच्या तपासणीमध्ये या मानवी कवट्या खऱ्या नसून प्लॅस्टिकच्या असल्याचं समोर आलं आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार दिल्ली येथील डीडीयू मार्गावर काली माता मंदिर परिसरात एक सफाई कर्मचारी परिसर स्वच्छ करत होता. याचवेळी त्याचा झाडू एका जीर्ण झालेल्या पेटीला लागला. उत्सुकतेपोटी त्याने ती पेटी उघडून पाहिली तर त्यात काही मानवी कवट्या आणि एक सांगाडा होता. यामुळे घाबरलेल्या या कर्मचाऱ्याने याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी देखील तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला पोलिसांना देखील या खऱ्या मानवी कवट्या असल्याचं वाटलं. मात्र त्यानंतर फॉरेन्सिक लॅबच्या तपासणीमध्ये या सर्व कवट्या प्लॅस्टिकच्या असल्याचं समोर आलं आहे.
दरम्यान त्यानंतर या प्लॅस्टिकच्या कवट्या पेटीमध्ये कशा आल्या याचा शोध पोलिसांनी सुरू केला असता, तेथील एका शाळेच्या विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या अभ्यासाठी या प्लॅस्टिकच्या कवट्या खरेदी करण्यात आल्या होत्या. परंतु शाळेने जेव्हा ती इमारत बदलली तेव्हा ते सर्व सामान देखील एका भंगारवाल्याला विकण्यात आलं होतं, त्यातीलच हे समान असावं अशी माहिती समोर येत आहे.
