कॉकरोच जनता पार्टीची थेट धमकी, सरकारची उडाली झोप, एका पोस्टने पळता भुई कमी..

कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन देशभरात सुरू होते. जंतर मंतरवर विद्यार्थी मोठ्या संख्येने जमले होते. अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर हे आंदोलन शांत झाले. मात्र, आता नवा इशारा कॉकरोच जनता पार्टीने सरकारला दिला.

कॉकरोच जनता पार्टीची थेट धमकी, सरकारची उडाली झोप, एका पोस्टने पळता भुई कमी..
Cockroach Janata Party
| Updated on: Jul 27, 2026 | 3:58 PM

कॉकरोच जनता पार्टीचे मोठे आंदोलन सुरू होते. या आंदोलनाला देशभरातून प्रतिसाद मिळाला. विद्यार्थी आक्रमक भूमिका घेताना दिसले. एक एक करून देशभरातील सर्व शहरांपर्यंत आंदोलन पोहोचले. विद्यार्थी सरकारविरोधात रस्त्यावर उतरले. जंतर मंतर मैदानावर आंदोलन सुरू असताना याच मुद्द्यात राहुल गांधी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराबाहेर आंदोलनासाठी बसले. त्यानंतर वातावरण अधिकच चिघळताना दिसले.  20 जुलै रोजी मोठा मोर्चा संसदेवर निघाला. हा मोर्चा संसद परिसरात पोहोचला. त्यानंतर थेट मोठा हिंसाचार झाला. पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. अभिजीत दिपके यांनी सरकारला मोठा इशारा दिला. अभिजीत दिपकेने म्हटले की, जर आता धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला नाही तर मोदींना आपला राजीनामा द्यावा लागेल.

यामध्येच आता कॉकरोच जनता पार्टीने पुन्हा एकदा सरकारला मोठा इशारा दिला. कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन संपले आहे. मात्र, आंदोलकांवर कायदेशीर कारवाई केली जात आहे. त्यांना अटक केली जात आहे. सीजेपीचे प्रवक्ते साैरभ दास याने मोठे भाष्य केले. वेगवेगळ्या राज्यातून आंदोलकांना ताब्यात घेणे, त्यांना अटक करणे याबाबत माहिती पुढे येत आहे.

जर उद्यापर्यंत सर्व एफआयआर वापस घेतले नाही तर पुढे काय करायचे याचा विचार केला जाईल. सीजेपीने दावा केला की, बिहार, आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये एसन्सीकडून आंदोलकांना टार्गेट केले जात असल्याची माहिती मिळतंय. सीजेपीच्या इशाऱ्यानंतर तात्काळ सरकारने आंदोलकांवरील एफआयआर वापस घेतले जातील आणि कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याचे म्हटले. मात्र, येणारे रिपोर्ट नक्कीच चिंताजनक होते.

जर आंदोलकांवरील कारवाई सुरूच राहिली तर सीजेपी पुढचा विचार करू शकते. हेच नाही तर कॉकरोच जनता पार्टीचे शिष्टमंडळ ज्यावेळी सरकारच्या शिष्टमंडळाच्या भेटीला पोहोचले होते, त्यावेळीच आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत निर्णय झाला होता. पहिल्याच बैठकीत सरकारने त्यांची मागणी ही मान्य केली होती. मात्र, तरीही आंदोलकांवर कारवाई होत असल्याचा आरोप सीजेपीचा आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us